35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यसमाजाने नाकरलेल्या दिव्यांगांना नवी उमेद देणारी 'फिनिक्स स्पोर्टस’ संस्था

समाजाने नाकरलेल्या दिव्यांगांना नवी उमेद देणारी ‘फिनिक्स स्पोर्टस’ संस्था

आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग (Cerebral Palsy)व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असतं. याच दिव्यांग व्यक्तींसाठी समजात अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यातील एक संस्था म्हणजे ‘फिनिक्स स्पोर्टस’. सेरेब्रल पाल्सीसारख्या (Cerebral Palsy) दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याचं काम ‘फिनिक्स स्पोर्टस’ ही संस्था करते. निवृत्त अधिकारी श्री. साईकृष्ण हट्टंगडी यांनी ही संस्था सुरू केलीय. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 'उत्थान रत्न' पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. (Cerebral Palsy Phoenix Sports will be honored with the Utthan Ratna award )

आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग (Cerebral Palsy)व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असतं. याच दिव्यांग व्यक्तींसाठी समजात अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यातील एक संस्था म्हणजे ‘फिनिक्स स्पोर्टस’. सेरेब्रल पाल्सीसारख्या (Cerebral Palsy) दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याचं काम ‘फिनिक्स स्पोर्टस’ ही संस्था करते. निवृत्त अधिकारी श्री. साईकृष्ण हट्टंगडी यांनी ही संस्था सुरू केलीय. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ‘उत्थान रत्न’ पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. (Cerebral Palsy Phoenix Sports will be honored with the Utthan Ratna award )

सेरेब्रल पाल्सीसारख्या दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याचं काम ‘फिनिक्स स्पोर्टस’ ही संस्था करते. निवृत्त अधिकारी श्री. साईकृष्ण हट्टंगडी यांनी ही संस्था सुरू केलीय. २००६ सालापासून ही संस्था कार्यरत आहे.

हट्टंगडी यांच्या कल्पनेतून सेलेब्रल पाल्सी व अन्य दिव्यांग मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत हॅंडबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, क्रिकेटचे सामने भरविले जातात. पावसाळ्यात कॅरम, टेबल टेनिस, इन डोअर गेम्स अशा खेळांचं आयोजन केलं जातं.

दिव्यांगत्व आलं तरी व्हीलचेअर तिच्या यशाच्या आडवी आली नाही, वाचा रिद्धीची यशोगाथा

फिनिक्सनं अशा मुलांसाठी गायन, वादन, नृत्य स्पर्धा भरवायलाही सुरूवात केलीय. छोट्या छोट्या सहलीही आयोजित केल्या जातात. यातील अनेक स्पर्धांमध्ये गुजरात, गोवा, औरंगाबाद येथील मुलांनी आपलं कौशल्य दाखवलंय. यामध्ये मानसिक विकलांग, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग अशा अनेक मुलांचा सहभाग होता. २०२२ पासून व्हीलचेअर हॅंडबॉल या स्पर्धेचंही नव्याने आयोजन केलं जातंय.

महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

विविध कार्यक्रमांच्या वेळी धनराज पिल्ले, अजित तेंडुलकर, दिलिप वेंगसरकर, बोमन इराणी, गायक शान, जॉनी लिव्हर अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या तोंडून मुलांच्या कलागुणांचं कौतुक होतं, तेव्हा मुलंही हरखून जातात.

‘फिनिक्स स्पोर्टस’चं हे कार्य पुढ नेण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक विना मोबदला कष्ट उपसत असतात. दुर्लक्षित घटकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचं काम करणाऱ्या या ‘फिनिक्स स्पोर्टस’चा ‘उत्थान रत्न’ पुरस्काराने गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी