37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहापालिका अग्निशमन विभागाचा दणका शहरातील २४७ रुग्णालयांचे पाणी आणि वीज कनेक्शन...

महापालिका अग्निशमन विभागाचा दणका शहरातील २४७ रुग्णालयांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडणार

महापालिका अग्निशमन विभागाने नोटिसा बजाऊनही शहरातील २४७ रुग्णालयांनी फायर आॅडिटकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता अग्निशमन विभाग फायर आॅडिट करण्यास नकारघंटा देणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडणार आहे. तसेच तरी देखील सहकार्य करणे टाळल्यास रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याचा पर्यायावर देखील विचार करु शकते.राज्यात मागील काही वर्षात रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवीत हानी झाली आहे.त्यामुळे खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले. महापालिकेकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात फायर ऑडिट करून घेण्याची नोटीस बजावली जाते.(Bmc fire department to disconnect water and electricity connections of 247 hospitals in the city)

या वर्षीदेखील शहरातील ६२२ रुग्णालयांना अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही, याचा दाखला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.मागील १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. शहरातील ६२२ पैकी त्यापैकी ३७५ रुग्णालयांनी फायर आॅडिट अहवाल सादर केला. तर २४७ रुग्णालयांनी हा अहवाल सादर करणे टाळले आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा मोठा हलगर्जीपणा आहे. अग्निशमन विभागाने या रुग्णालयांना अहवाल सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची नोटिस बजावली. परंतू तरी देखील रुग्णालयांनी अहवाल सादर केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अग्निशमन विभाग फायर आॅडिटकडे पाठ फिरवणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडणार आहे.

प्रतिक्रिया
शहरातील ज्या रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसेल त्यांनी पुढिल पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून रुग्णालयांचे वीज व नळ कनेक्शन तोडले जाईल.
– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी