28 C
Mumbai
Saturday, June 22, 2024
Homeआरोग्यCoronaeffect : मुंबईतील 'कोरोना' रूग्णसंख्येची वाटचाल 75 हजारांकडे

Coronaeffect : मुंबईतील ‘कोरोना’ रूग्णसंख्येची वाटचाल 75 हजारांकडे

अभिषेक सावंत

लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करण्याच्या हालचाली सुरू असताना मुंबई महापालिका (BMC) कोरोनाचे रुग्ण आणि हाय रिस्क व्यक्तींसाठी ७६ हजार खाटांची व्यवस्था करत आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे (Corona Virus) ७५ हजार रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

त्यासाठी महापालिकेने गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान व हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस सेंटर ऑफ इंडिया येथे विलगीकरण केंद्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे ३०० खाटा, वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात १०० खाटा, नेहरू तारांगणात २०० खाटा, जेजे रुग्णालयाजवळील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीत २०० खाटा अशी विलगीकरण केंद्रे उभारण्यात येत आहेत.

माहीम येथील निसर्ग उद्यानातही विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. मुंबईतले अन्य हॉटेल, वसतिगृहे, क्रीडासंकुलांत २५ हजार खाटा, शाळांमध्ये ३५ हजार खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

म्हणजे पुढे येणारे कोरोनाचे संकट अतिशय गंभीर आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढवीत आहे. मुंबईत कोविड रुग्णांना आणि मृतांनाही ठेवायला जागा नाही. रिकाम्या इमारती, मैदाने, हॉटेल्स वगैरे ताब्यात घेऊन तेथे रुग्णांना ठेवले जात आहे. त्यातले काही रुग्ण बरे होऊन घरीदेखील जात आहेत. अशा रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत वगैरे केले जात असले तरी झपाट्याने रुग्ण वाढ होणे हे काही चांगले लक्षण नाही.

त्यातच स्थलांतरीत मजूर आणि गावी जाण्यासाठी निघालेले व काही गावागावात पोहचलेले अनेकजण कोरोना पॉजिटीव्ह आढळल्याने आता ग्रामिण भागातील कोरोना संकटही गंभीर समस्या निर्माण करणारे ठरणार आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आणि त्यावर ठोस उपाय योजना राबवणे आवश्यक असताना आजही केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्याने न घेता नेतेमंडळी मिळेल तसे या गोष्टीतही राजकारण करत आहेत. सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले… हातात नाही दमडी… तिजोरीत खणखणाट.. आणि डोक्यावर कोट्यवधी-अब्जावधी रुपयांचे कर्जाचे डोंगर असताना राज्यकर्ते कोट्यवधींच्या मदतीचे, आर्थिक पॅकेजची पोकळ घोषणा करत आहेत.

हा पैसा कोठून उभा करणार आहे, याचा विचार कोणी केला काय? या लोकांना आरबीआयचा संचित निधी पुरला नाही, यांनी कोणाच्या भरवशावर एव्हढे मोठे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले? १९-२० ची वित्तीय तूट ७.०३ लाख कोटी रूपये होती. मग आता २०-२१ मध्ये काय अवस्था राहिल? ही सर्व तूट कशी आणि कोठून भरून काढणार? याचा कोणीच विचार करत नाही. देशाचे वाटोळे करणार आहेत हे…. बाकीचे मात्र वैफल्यग्रस्त होतील, वेड लागेल, आत्महत्या वाढतील आणि आपणही कोरोनासोबत जगताना सोशल डिस्टन्सिंगमुळे एकमेकांची जवळीक कमी करणार.. शहरी आणि ग्रामिण अशी उभी फूट पडणार आणि एक दिवस कोरोनाचेच बळी ठरणार… कोणाचे कोणाला सोयरसुतक नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी