28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यतुम्ही उन्हाळ्यात खजूर खाऊ शकता का?

तुम्ही उन्हाळ्यात खजूर खाऊ शकता का?

उन्हाळ्यात खजूर (khajur) खावं की नको असा अनेकांना प्रश्न पडतो. बहुतांश जणांचा असा विश्वास आहे की, खजूर(khajur) खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पण ते खरं नाही. उलट ताकदीसाठी खजूर खाणं उत्तम. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. नियमित खजूर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते आपण जाणून घेऊयात.(khajur eating benefits in summer)

उन्हाळ्यात खजूर (Dates ) खावं की नको असा अनेकांना प्रश्न पडतो. बहुतांश जणांचा असा विश्वास आहे की, खजूर(Dates ) खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पण ते खरं नाही. उलट ताकदीसाठी खजूर खाणं उत्तम. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. नियमित खजूर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते आपण जाणून घेऊयात.(Dates eating benefits in summer)

उन्हाळ्याच्या काळात खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. खजूर आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, अल्झायमर इत्यादी आजारांपासून देखील संरक्षण करते आणि यामुळे क्रॉनिक कंडिशनमध्येही सुधारणा होते.

शक्तपणा दुर होतो

शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. खजूरामध्ये आयर्न मोठ्या प्रणामात आढळतं. रोज खजूर खाल्याने अशक्तपणा दुर होतो.

रोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर

शूगर लेव्हलवर नियंत्रण

जर काही गोड खाण्याचं मन झालं तर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी दोन खजूर खावे. गोड खाण्याची तलब भागवण्यासाठी खजूर खाणे सर्वात हेल्दी पद्धत आहे. पण यात कॅलरीजही अधिक प्रमाणात असल्याने जास्त खाणे नुकसानकारक ठरु शकतं.

पचनक्रिया चांगली राहते

खजुरात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पचनक्रिया नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचे आजारही होण्याची शक्यता कमी असते.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे आंब्याची पाने, जाणून घ्या

त्वचा चमकते

खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होते.

स्पर्म काउंट वाढतो

खजूर खाल्ल्याने पुरूषांमध्ये स्पर्म काउंट आणि स्पर्म क्वालिटी वाढण्यास मदत मिळते. यात एस्ट्राडियोल आणि फ्लेवोनोइड सारखे पोषक तत्व असतात. जे स्पर्म काउंट वाढवण्यास मदत करतात.मदत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी