33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeव्यापार-पैसाराहुल गांधींनी 'त्या' वाहनांचं लाखो रुपयांचं तटवलं भाडं; नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधींनी ‘त्या’ वाहनांचं लाखो रुपयांचं तटवलं भाडं; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच, भारत जोडो न्याय यात्रा पार पडली. पण या यात्रेदरम्यान वापरण्यात आलेल्या वाहनांचे लाखो रुपयांचं भाड दिलेलं नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केली आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेतील वाहनांची थकबाकीही अद्याप दिली नसल्याचंही सांगण्यात येत आहे. (Rahul Gandhi bharat jodo nyay yatra used vehicles not received Payment)

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच, भारत जोडो न्याय यात्रा पार पडली. पण या यात्रेदरम्यान वापरण्यात आलेल्या वाहनांचे लाखो रुपयांचं भाड दिलेलं नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केली आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेतील वाहनांची थकबाकीही अद्याप दिली नसल्याचंही सांगण्यात येत आहे. (Rahul Gandhi bharat jodo nyay yatra used vehicles not received Payment)

भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी असलेल्या 25 हून अधिक वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप बुलंदशहरच्या अनुपशहर कोतवाली भागातील रोरा गावातील रहिवासी मोती, सतेंद्र, धर्मेंद्र आणि रामकिशन यांनी केला आहे. “आमचं पेमेंट तर करा…” अशी मागणी ते वारंवार करत आहेत.

या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत आमच्या कंटेनर वाहनांचा समावेश होता, मात्र या वाहनांचं लाखो रुपयांचं भाडं अद्याप बाकी आहे. अनेक वेळा विनंती करून देखील आम्हाला वाहनांचे पूर्ण पैसे मिळाले नसल्याचे मोती, सतेंद्र, धर्मेंद्र आणि रामकिशन यांनी म्हटलं आहे.

कंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

सरकारने संसदेत लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी न दिल्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. आणि या उपक्रमाचा उद्देश न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची तत्त्वे पुन्हा प्रस्थापित करणे हा असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.

स्वत:चे घरही नसलेल्या राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती?

राहुल गांधी हे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. 1970 मध्ये राहुल गांधींचा जन्म झाला. तीनवेळा खासदार झालेले आणि सदस्यत्व गमावलेल्या राहुल गांधी यांच्या मालमत्तेत त्यांचे स्वतःचे घरही नाही. फक्त शेतजमीन आणि पोस्ट ऑफिस इत्यादींमध्ये केलेली काही गुंतवणूक आहे.

राहुल गांधी दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी गेल्या सलग 5 वर्षांपासून सुमारे 1 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरला होता.
राहुल गांधींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 15 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर सुमारे 72 लाख रुपयांचे कर्ज आहे. राहुल गांधी यांचे दिल्लीतील महरौली येथे एक शेत आहे ज्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

गुरुग्राममधील एका व्यावसायिक इमारतीत त्यांची जागा आहे. त्याची किंमत 8.75 कोटी रुपये आहे. एक प्रकारे त्यांच्याकडे घर नसून दुकान आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी