35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यव्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

व्यायाम (Exercise) करणे खूप गरजेचे आहे. आजकाल सर्वांचे आयुष्य खूप व्यस्त आहे. लहान मुलं शाळेत व्यस्त असतात. तर मोठे लोक आज आपल्या कामाला स्वतःपेक्षा जास्त महत्व देत आहे. त्यामुळे त्यांचे त्यांच्या शहरीराकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्यांना नकळत ते कुठल्या न कुठल्या आजाराच्या आहारी जात असतात. (Exercise benefits What is best time to do exercise evening or morning) आपल्या शरीरासाठी व्यायाम फार गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या शरीराला आणि मेंदूला सुद्धा चांगले वाटत. पण काही लोक म्हणतात की, त्यांना व्यायाम करायला वेळ नाही मिळत. अशावेळी त्यांना प्रश्न पडतो की, त्यांनी कुठल्या वेळेला व्यायाम करायचा.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात; हे करा घरगुती उपाय अन् मिळवा तजेलदार त्वचा

व्यायाम केल्याने शरीराची ताकद वाढते, वजन कमी करण्यात मदत मिळते, मेटॅबॉलिझम वाढवणं, बीपी शुगर कंट्रोलमध्ये पण व्यायाम मदत करते. पण तो कधी करावा यावरून मात्र अनेक वाद-प्रतिवाद आहेत.

जेव्हा व्यायामाचा विचार येतो तेव्हा अनेकदा लोकांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम किती वाजता करावा यावर वाद होतात. काही लोकांचे म्हणणे आहे की व्यायाम रोज सकाळी केला पाहिजे, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की संध्याकाळी व्यायाम करणे चांगले आहे आणि दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत. निरोगी जीवन जगण्यासाठी, आपण निश्चितपणे दररोज व्यायाम करण्याचा निर्णय घेतो परंतु खराब दिनचर्यामुळे, आपण दररोज व्यायाम करू शकत नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी व्यायाम केल्याने तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतील, परंतु तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करावे ही तुमची दिनचर्या, जीवनशैली आणि ध्येयांवर अवलंबून असते.

पीरियड्समध्ये सुरक्षित होळी खेळण्यासाठी आहे? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

सकाळच्या व्यायामाचे फायदे
दररोज सकाळी व्यायाम केल्याने तुमची चयापचय क्रिया मजबूत होते आणि कॅलरी बर्न करण्यासही मदत होते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी सहजपणे बर्न होते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता देखील वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्याने तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता असे नाही तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते. यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला आणि फ्रेश राहतो. व्यायाम केल्याने तुम्ही पॉसिटीव्ह राहतात आणि ज्यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. सकाळी व्यायाम केल्याने तुम्ही दररोज तुमचे वेळापत्रक सहजपणे व्यवस्थापित करू शकता आणि एक निश्चित वर्कआउट रूटीन देखील फॉलो करू शकता.

सकाळच्या व्यायामाचे तोटे
अनेक फायद्यांसोबतच सकाळी व्यायाम करण्याचे काही तोटेही आहेत. काही लोकांना सकाळी त्यांच्या शरीरात जडपणा जाणवतो, ज्यामुळे त्यांना व्यायाम करताना समस्या येऊ शकतात. या कारणास्तव, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कोणताही जड व्यायाम टाळला पाहिजे. ज्या लोकांना सकाळी व्यायामाची सवय नसते त्यांना लवकर थकवा जाणवू शकतो.

तुमची पण त्वचा तेलकट आहे? मग होळीच्या दिवशी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि चेहऱ्याची काळजी घ्या

संध्याकाळचा व्यायाम कोणासाठी फायदेशीर आहे?
काही संशोधनात असे दिसून आले आहे की संध्याकाळी व्यायाम केल्याने स्नायूंची ताकद वाढते आणि स्नायू वाढण्यास देखील मदत होते. काही लोकांना सकाळच्या तुलनेत संध्याकाळी जास्त सक्रिय वाटते, अशा लोकांनी व्यायाम किंवा कसरत फक्त दुपारी किंवा संध्याकाळीच करावी. संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा मानसिक थकवा दूर होऊ शकतो. तुमची हाडे सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अधिक लवचिक असतात, ज्यामुळे तुम्हाला व्यायाम करणे सोपे होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी