28 C
Mumbai
Wednesday, September 18, 2024
Homeआरोग्यचमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

आम्ही तुम्हाला सौंदर्य वाढवण्यासाठी गिलॉयचा वापर सांगणार आहोत. गिलॉयचे सेवन केल्यानेच नाही तर ते लावल्याने त्वचा सुधारते आणि डाग दूर होतात. (giloy benefits  face for skin problems)

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य नाही. कारण प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम, डाग आणि थकवा दिसायला लागतो. अशा परिस्थितीत लोक पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतात, ज्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. येथे आम्ही तुम्हाला सौंदर्य वाढवण्यासाठी गिलॉयचा वापर सांगणार आहोत. गिलॉयचे सेवन केल्यानेच नाही तर ते लावल्याने त्वचा सुधारते आणि डाग दूर होतात. (giloy benefits  face for skin problems)

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

चेहऱ्यावर गिलॉय कसे वापरावे

गिलोय- दूध
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी दुधासोबत गिलॉयचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला 1 चमचा गिलॉय पावडर लागेल. या पावडरमध्ये कच्चे दूध मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर फेस पॅकप्रमाणे चेहरा आणि मानेवर लावा. 20 ते 30 मिनिटांनंतर हा फेसपॅक ताज्या पाण्याने स्वच्छ करा. काही दिवसांच्या वापरानंतरच तुम्हाला चमक दिसू लागेल. (giloy benefits  face for skin problems)

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

गिलोय-मध
चेहरा तरुण बनवण्यासाठी गिलॉयमध्ये मध मिसळून वापरा. यासाठी तुम्हाला गिलॉयची ताजी फळे लागतील. या फळांची पेस्ट बनवा आणि त्यात मध घाला. गिलोय आणि मधाची ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. याच्या वापराने चेहरा घट्ट होईल. (giloy benefits  face for skin problems)

गिलॉय-गुलाब पाणी
गुलाब पाणी आपल्या चेहऱ्यासाठी फार उत्तम आहे. गुलाब पाणी मध्ये जर गिलॉय पावडर मिक्स केले तर ते उत्तम फेस पॅक बानू शकते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येते. यासाठी 1 चमचा गिलॉय पावडर घ्या आणि आवश्यकतेनुसार त्यात गुलाब पाणी मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि सुकल्यानंतर धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा पॅक वापरा. (giloy benefits  face for skin problems)

गिलॉय लाकूड
गिलॉयचे लाकूड देखील खूप फायदेशीर आहे, गिलॉयचे लाकूड बारीक करून त्वचेवर लावल्याने रॅशेस आणि ॲलर्जीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासोबतच ही पेस्ट लावल्याने मुरुमांची समस्याही कमी होते. गिलॉय लाकडाची पेस्ट चेहऱ्यावर कोरडे होईपर्यंत लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. (giloy benefits  face for skin problems)

गिलॉय-एलोवेरा
गिलॉयमध्ये कोरफड मिसळून लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. यासाठी 1 चमचे गिलॉय स्टेम पेस्टमध्ये एलोवेरा जेल मिसळा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. (giloy benefits  face for skin problems)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी