31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यथंडीत कोरड्या केसांनी हैराण ? मग करा हे उपाय

थंडीत कोरड्या केसांनी हैराण ? मग करा हे उपाय

टीम लय भारी

सगळ्याच ऋतू मध्ये आपल्याला आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे,आणि थंडीमध्ये तर विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये हवेमुळे केस कोरडे होतात(Health care:Troubled by cold dry hair?) 

प्रदुषण आणि केसांची काळजी न घेणे या कारणामुळे आपल्याला केस गळतीला सामोरे जावे लागते. यामुळेच जर तुम्हाला तुमचे केस मऊ आणि सिल्की हवे असतील तर  करा हे उपाय.

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ महत्त्वाची लक्षणे जाणून घ्या

नारळाच्या तेलाने मसाज करणे

थंडीच्या ऋतूत  केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच केस खूपच कोरडे वाटू लागतात. त्यामुळे अशावेळी नारळाचे तेल उपयोगी पडते. तेव्हा नारळाच्या तेलाने केसांना चांगला मसाज करायचा. केसांना लावायच्या आधी तेल थोडंफार गरम करून घ्यायचं. अशा प्रकारे गरम तेलाने मालिश केल्याने केस मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे केसांचं रक्ताभिसरण चांगल होतं.

Health care:Troubled by cold dry hair? in winter
प्रदुषण आणि केसांची काळजी न घेणे या कारणामुळे आपल्याला केस गळतीला सामोरे जावे लागते

सारखे केस धुवू नये

थंडीच्या वातावरणात केस सारखे धुवू नये. केस सतत धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून केस कोरडे पडतात. केस हे आठवड्यातून फक्त दोनच वेळा धुवावेत. केस धुताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची ती म्हणजे, केसांना कंडिशनर लावणे. त्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.

दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता – राजेश टोपे

A nutritionist, a dermatologist and a hairstylist share their top tips to prevent hair fall

केसांना कोरफड लावावी

कोरफड जेल केसांना लावल्याने केस गळती आटोक्यात येण्यास मदत होते. त्यामुळे केस दाट आणि मजबूत बनतात. तसेच कोरफडीचा रस काढून केसांना लावल्याने कोंडाही कमी होतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस टाकल्याने केस खूप छान व मऊ होण्यास मदत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी