29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यHair Care : निरोगी केस ठेवायचे असतील तर नारळाच्या तेलात ‘या’ गोष्टी...

Hair Care : निरोगी केस ठेवायचे असतील तर नारळाच्या तेलात ‘या’ गोष्टी मिक्स करुन सुंदर केस मिळवा!

टीम लय भारी

मुंबई : चेहऱ्याच्या सौंदर्यात केसांची भूमिका महत्त्वाची असते. पण आजच्या काळात मुली स्मार्ट लूक देण्यासाठी रिबॉन्डिंग आणि स्मूथिंगच्या नावाखाली केमिकल असलेली उत्पादने वापरतात, केसांना रंग देऊन केस हायलाइट करतात आणि हीटिंग टूल्सचा अधिक वापर करतात(Healthy Hair: Mix this things in coconut oil and get beautiful hair!)

त्यामुळे केस अधिक खराब होतात. अशा परिस्थितीत केस झपाट्याने गळू लागतात, कमकुवत होतात आणि तुटतात.

थंडीत कोरड्या केसांनी हैराण ? मग करा हे उपाय

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

तुम्हालाही अशी काही समस्या असल्यास नारळाचे तेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. नारळ तेलामध्ये बुरशीविरोधी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि फॅटी अॅसिड गुणधर्म असतात. जर नारळाच्या तेलात काही घटक मिक्स केले तर केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.

नारळ तेल आणि मध

दोन चमचे नारळ तेल घेऊन गरम करा. त्यात मध मिसळा आणि हे तेल केसांना लावा. साधारण अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. नारळ आणि मध यांचे मिश्रण केसांना मऊ करते आणि चमक आणते.

कपडे महागणार | ड्रेस आणि फुटवेअरवर 5% ऐवजी 12% GST, जानेवारी 2022 पासून नवे दर

Dyson launches its Black Friday sale early

नारळ तेल आणि केळी

केसांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी केळी फायदेशीर आहे. अर्धी केळी नारळ तेलात मिसळून हेअर पॅकप्रमाणे केसांना लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. केस फुटण्याची समस्या दूर होते. हा पॅक केसांना सुमारे 30 मिनिटे लावा आणि केस धुवा.

नारळ तेल आणि लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी सोबत अँटीफंगल गुणधर्म असतात. हे टाळू स्वच्छ करते आणि केसांची चांगली वाढ करण्यास मदत करते. कोंड्याची समस्या दूर करते. नारळ तेलामध्ये लिंबू मिक्स करा आणि केसांना लावा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

केस मऊ ठेवण्यासाठी खास उपाय

शॅम्पूसह अनेक केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये असलेले केमिकल अंततः केसांचे नुकसान करते. कारण त्यात जास्त प्रमाणात रसायने असतात. त्यांच्या अत्यधिक वापरामुळे, केसांमध्ये नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि ते निर्जीव तसेच गुंतलेले दिसतात. ही समस्या विशेषतः आर्द्र वातावरणात निर्माण होते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी ओल्या केसांमध्ये नारळ तेलाचे काही थेंब घाला. असे केल्याने हा ओलावा केसांमध्येच टिकून राहतो आणि केस मऊ होतात.

सूचना : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी