35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यतुमच्या दातांवर देखील आला पिवळेपणा? मग आता घरबसल्या करा 'हे' सोपे उपाय

तुमच्या दातांवर देखील आला पिवळेपणा? मग आता घरबसल्या करा ‘हे’ सोपे उपाय

दात (Teeth) हे आपल्या चेहऱ्याची शान असते. दात साफ आणि पांढरे दिसले नाही तर आपला कॉन्फीइडेन्स पण कमी होऊन जातो. दातांचं पिवळेपणा शक्यतो अयोग्य दात घासणे, खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दिसू लागतो. यामुळे अनेकवेळा तुम्हाला लाज वाटते आणि तुम्ही मोकळेपणाने हसू शकत नाही. (health tips Yellowing of your teeth then follow this home remedies) त्याच वेळी, जर त्यावर बराच काळ उपचार आणि साफसफाई केली गेली नाही तर ते दातांसंबंधी इतर समस्यांचे कारण बनू शकते. जरी, तुमचे दात पांढरे करण्यासाठी, तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन दात पांढरे करण्यासाठी उपचार घेऊ शकता, परंतु त्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे यावर काही घरगुती उपाय शोधणे चांगले. आज आम्ही तुम्हाला दातांचा पिवळेपणा दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.

व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

दातांना पिवळेपणा येण्यामागचे काय कारण आहेत?
1. बरोबर ब्रश न करणे
2. अधिक गोड़ खाणं खाणे
3. धूम्रपान, तंबाखू, इत्यादी चे सेवन करणे
4. खाऊन झाल्यावर तोंड बरोबर न धुणे
5. दातांच्या स्वच्छतेची चांगली काळजी न घेणे
6. डेंटिस्ट कडे नियमित तपासून न घेणे

दात पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय

-इनो तुम्हाला तुमचे पिवळे दात मोत्यासारखे चमकवण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त एक पॅकेट इनो घ्या आणि एका भांड्यात काढा. आता त्यात १ चमचा खोबरेल तेल टाकून पेस्ट तयार करा. या पेस्टने 3-5 मिनिटे दात घासून घ्या. असे आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात; हे करा घरगुती उपाय अन् मिळवा तजेलदार त्वचा

– तुमचे दात खूप पिवळे पडत असतील तर काही वेळ खोबरेल तेल दातांवर ठेवा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. रात्रीच्या वेळी संत्र्याची सालही दातांवर घासावी. याने तुमच्या तोंडातील दुर्गंधी नाहीशी होईल आणि दातांवरील घाण साफ होईल.

– एक चमचा मीठामध्ये लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल मिसळून पेस्ट बनवा. आता तयार केलेल्या पेस्टच्या मदतीने 3 दिवस दात घासून घ्या. या उपायाने दातांवरील पिवळा थर बऱ्याच अंशी कमी होईल.

– कडुलिंबाची टूथपेस्ट दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. घासण्याऐवजी याने दात स्वच्छ करणे सुरू करा, मग पहा तुमचे तोंडाचे आरोग्य कसे सुधारते.

पीरियड्समध्ये सुरक्षित होळी खेळण्यासाठी आहे? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

– पिवळे दात घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि मीठ एकत्र करून ब्रशच्या मदतीने दात स्वच्छ करा, यामुळे तुमचे दात पांढरे आणि चमकदार होतील.

-बेकिंग सोडा हा प्लेक, टार्टर, आणि बॅक्टरीया साफ करण्यासाठी फार गुणकारी आहे. थोडासा बेकिंग सोडा हा ब्रश वर घ्यावा आणि दात साफ करावे. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात अधिक पांढरे दिसू लागतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी