29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यWarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र...

WarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र आव्हाड

WarAgainstVirus साठी उद्धव ठाकरे कष्ट घेत आहेत

टीम लय भारी

मुंबई : किल्लारी भूकंपग्रस्तांना शरद पवारांनी ( Sharad Pawar ) संकटातून बाहेर काढले होते. त्यासाठी ते तिथे ठाण मांडून बसले होते. तसेच कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) करीत आहेत. ‘कोरोना’चे संकट मोठे आहे. पण या संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी ( WarAgainstVirus ) उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) प्रयत्न करीत आहेत. आपण घराच्या बाहेर न पडता त्यांच्या या प्रयत्नांना साथ द्यायला हवी, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अन्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना माझा सलाम आहे. मानवतेची सेवा यापेक्षा वेगळी काय असू शकेल. कोरोना व्हायरस भयंकर आहे. तरीही हे डॉक्टर्स काम करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोन्ही मंत्री सुद्धा फार चांगले काम करीत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकेक टाळी झाली पाहिजे. मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून धोका गंभीर असल्याचे सांगत आहेत. लोकांचा जीव वाचविण्यासाठी मुख्यमंत्री झटत  ( WarAgainstVirus ) आहेत. त्यांचा जीव लोकांवर व महाराष्ट्रावर आहे. ज्या पद्धतीने शरद पवारांनी किल्लारी वाचविली त्या पद्धतीने उद्धव ठाकरे काम करीत आहेत.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा शिवरायांचा महाराष्ट्र अशा संकटांना कधीच घाबरत नाही. ठाकरे सांगत आहेत, घरात बसा. कारण संसर्ग होऊ नये. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. महाराष्ट्र किती संकटात जाणार आहे याची कल्पना तुम्हाला नसेल. पण ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे ( WarAgainstVirus ) म्हटले जाते. म्हणून मुख्यमंत्र्यांना साथ देऊया. कलम १४४ चे तंतोतंत पालन करूया, आणि महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढूया. नेताच अशा संकटातून लोकांना बाहेर काढतो असे इतिहासाने दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे व राजेश टोपे सुद्धा महाराष्ट्राला संकटातून नक्की बाहेर काढतील असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ईश्वरी कार्य : राजेश टोपे

मुंबई : ईश्वर कुणी पाहिलेला नाही. पण डॉक्टर हाच ईश्वर आहे असे म्हटले जाते. ‘कोरोना’च्या संकटकाळात डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी फार चांगले काम करीत आहेत. या सगळ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी भावना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली आहे.

गेली काही दिवस मी मुंबईतील कस्तुरबा रूग्णालय, पुण्यातील नायडू रूग्णालयाला भेट दिली. राज्यातील इतर रूग्णालयांची सुद्धा माहिती घेत आहे. ‘कोरोना’चे पॉझिटिव्ह रूग्ण, संशयित व्यक्ती आणि कॉरन्टाईन केलेल्या व्यक्ती यांच्यासाठी हे वैद्यकीय क्षेत्रातील सगळेजण फार चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे, असे टोपे म्हणाले.

जयंत पाटलांकडून राजेश टोपे यांचे कौतुक

जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांच्यावर एक व्हिडीओ तयार केला आहे. टोपे यांची आई इस्पितळात दाखल आहे. तरीही टोपे ‘कोरोना’च्या संकटकाळात पायाला ( WarAgainstVirus ) भिंगरी लावून फिरत आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची एक थाप दिलीच पाहिजे अशा संदेश या व्हिडीओमधून दिला आहे. हा व्हिडीओ जयंत पाटील यांनी ट्विट केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. राजेश टोपे आरोग्य मंत्री या नात्याने अहोरात्र कष्ट घेत आहेत. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या या शिलेदाराला सलाम अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टोपे यांचे कौतुक केले आहे.

सुप्रिया सुळे यांनीही केले होते कौतुक

खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राजेश टोपे यांचे ‘सुपरमॅन’ या शब्दांत कौतुक केले होते. ‘कोरोना’चा महाराष्ट्रात शिरकाव होण्याअगोदरपासूनच टोपे ‘अलर्ट मोड’वर होते. परदेशातून येणाऱ्या लोकांची माहिती घेणे, त्यांना कॉरन्टाईन करणे, वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणे याकडे टोपे यांनी डोळ्यात तेल घालून ( WarAgainstVirus ) लक्ष दिले. पुण्यात पहिल्यांदा कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर तर त्यांनी कामाचा झपाटा आणखी वाढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊन यंत्रणा कामाला लावली. मुंबईत कस्तुरबा व पुण्यात नायडू रूग्णालयात त्यांनी ‘कोरोना’ची उपचार केंद्रे सुरू केली. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्यांत तपासणी केंद्रे, उपचार सुविधा वाढवत नेली. आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर्स, महापालिकेचे आयुक्त यांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध उपचारपद्धती ठरवून दिली. या सगळ्या प्रयत्नांत ते रात्रंदिवस झपाटलेपणाने कष्ट घेत होते. त्याची दखल घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांचे ‘सुपरमॅन’ अशा शब्दांत कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

Workfromhome : धनंजय मुंडेंचे घरूनच काम, लेकीला दिला वेळ, पुस्तकांचेही केले वाचन  

जर्मनीमध्ये दोघांपेक्षा जास्त जणांना वावरण्यास बंदी

ऑस्ट्रेलियामध्ये धार्मिक स्थळे, पब्स व हॉटेल्सवर बंदी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी