27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यउद्धव ठाकरेंकडे जाण्याअगोदर राजेश टोपेंनी आईंची रूग्णालयात घेतली भेट

उद्धव ठाकरेंकडे जाण्याअगोदर राजेश टोपेंनी आईंची रूग्णालयात घेतली भेट

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह पुणे, पिंपरी चिंडवड व नागपूरमधील सगळे व्यवहार बंद करण्याची आज घोषणा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याअगोदर टोपे यांनी बॉम्बे इस्पितळात उपचार घेत असलेल्या आपल्या आईंची भेट घेतली.

गेल्या काही दिवसांपासून टोपे यांच्या आई रूग्णालयात आहेत. याच कालावधीत आरोग्य मंत्री या नात्याने टोपे ‘कोरोना’च्या धोरणात्मक प्रक्रियेत प्रचंड व्यस्त आहेत. आपल्या खासगी कामांसाठी त्यांना थोडाही वेळ काढता येत नाही. परंतु दररोज सकाळी थोडासा वेळ काढून ते इस्पितळात आईच्या भेटीसाठी जातात. आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सकाळी भेट ठरली होती. त्या अगोदर ते आवर्जून आईंना भेटायला गेले. आईंसोबत त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या. तब्येतीची चौकशी केली.

उद्धव ठाकरेंकडे जाण्याअगोदर राजेश टोपेंनी आईंची रूग्णालयात घेतली भेट

गुरूवारी रात्री सुद्धा टोपे यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीतच मुंबई, पुणे, नागपूरमधील सगळे व्यवहार बंद करण्याची चर्चा झाली होती. ही बैठक संपवून टोपे रात्री उशिरा मलबार हिल येथील त्यांच्या ‘जेतवन’ या सरकारी निवासस्थानी आले. तेथून त्यांनी रात्री ११ वाजता रूग्णालयात फोन लावला. आईंच्या तब्येतीची चौकशी केली. ‘बुधवारी आईची तब्येत चांगली होती. माझ्याशी ती व्यवस्थित बोलली सुद्धा होती. मग अचानक चार तासांतच तब्येत कशी काय खालावली ?’ अशा शब्दांत टोपे यांनी डॉक्टरांनी विचारणा केली. त्यावर डॉक्टरांनी काही वैद्यकीय कारणांची माहिती दिली. ‘आता तब्येत ठिक असल्याचे’ही डॉक्टरांनी सांगितले. यावेळी टोपे यांना भेटायला काही लोक आले होते. सगळ्यांच्या भेटी संपवल्या, अन् रात्री १२.३० नंतर त्यांनी जेवण घेतले.

तीन आठवड्यांपासून मतदारसंघात जायलाही टोपे यांना वेळ नाही

राज्याचे मंत्री म्हणून टोपे यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी ते नगरविकास राज्यमंत्री होते. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. आता आरोग्य मंत्री म्हणून नव्याने सूत्रे हाती घेतली आहेत. पण आपल्या या कारकिर्दीत त्यांनी मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. मंत्री असले तरी आठवड्यातील चार दिवस मतदारसंघात व तीन दिवस मुंबईत अशी त्यांची कामाची पद्धत आले. मंगळवार, बुधवार व गुरूवार ते मुंबईत असतात. उरलेले चार दिवस ते मतदारसंघात असतात. परंतु ‘कोरोना’मुळे तब्बल तीन आठवड्यांपासून त्यांना मतदारसंघात जाता आलेले नाही. टोपे यांच्या जालन्यामध्ये सहकारी संस्था आहेत. पूर्वी या संस्थांचा कारभार वडील पाहायचे. पण दीड वर्षांपूर्वी टोपे यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ही कामे सुद्धा टोपे यांनाच पाहावी लागतात. पण ‘कोरोना’च्या व्यस्त कामांमुळे टोपेंना या संस्थांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. फारच तातडीच्या विषयांत ते मतदारसंघातील राजकीय पदाधिकारी व सहकारी संस्थांमधील अधिकारी यांच्याशी रात्री उशिरा बोलतात. अगदी रात्री दोन वाजता त्यांचे फोन सुरू असतात, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

हे सुद्धा वाचा

Breaking : रेल्वे व बस सेवा सुरूच राहणार; पण मुंबई, पुणे, नागपूर बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी