35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यउसाचा रस शरीरासाठी आहे फायदेशीर, पण रोज किती प्रमाणात घ्याचा?

उसाचा रस शरीरासाठी आहे फायदेशीर, पण रोज किती प्रमाणात घ्याचा?

उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात जेवणापेक्षा पाणी पिण्याची जास्त इच्छा होते. बाहेर कुठे फिरायला गेलो असतांना आपली सर्वात पहिली नजर उसाच्या रसाकडे जाते. उसाच्या रसाचा स्टॉल दिसताच आपण लगेच तिथे थांबतो आणि आपली तहान मिटवतो, उसाचा रस पिणे शरीरासाठी चांगले आहे. (Sugarcane juice is beneficial for the body, but how much should be taken daily) यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तसेच, शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. उसाचा रस नियमित प्यायल्यास खूप फायदे होतात.

उसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. मात्र, उसाचा रस पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण लक्षात घेऊन प्या. उसाच्या रसमध्ये फायबरचे प्रमाण सुमारे 13 ग्रॅम असते. 183 कॅलरीज आणि 50 ग्रॅम साखर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही दिवसातून किती उसाचा रस प्यायला पाहिजे? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो की, आपण दिवसभरात किती ग्लास उसाचा रस प्यावा? (Sugarcane juice is beneficial for the body, but how much should be taken daily)

डार्क सर्कलपासून सुटका कशी मिळवायची? मग आजच करा ‘हे’ घरगुती उपाय

उसाचा रस शरीरासाठी अतिशय चांगला आहे. उसाचा रस दररोज मध्यम आकाराच्या ग्लासमधून सुमारे 1 ग्लास पिणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात उसाचा रस पिऊ नये. त्याच्या ताजेपणामुळे तुमची ते प्यायची इच्छा वाढू शकते. पण त्या पेक्षा जास्त उसाचा रस एकदिवसात पिल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकते.

उसाचा रस पिण्याची अशी कुठली निश्चित वेळ नाही. पण उसाचा रस दुअप्री पिल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते. महत्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला आधीच सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी उसाचा रस पिऊ नये. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

उन्हाळ्यात आवर्जून खा काकडी; जाणून घ्या फायदे

उसाच्या रस ताजे काढून ताबडतोब पिण्याचा प्रयत्न करा. खूप वेळेपासून काढलेला रस पिल्याने त्याचा तुमच्या शरीरावर उलटा परिणाम होऊ शकते. त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. तसेच अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. उसाच्या रसाचे फायदे आणि चव दुप्पट करण्यासाठी तुम्ही त्यात थोडा पुदिन्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून प्या.

तुम्हाला माहिती असायला हवे की उसाच्या रसामध्ये पोटॅशियम असते आणि ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स राखते. जे यकृताला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. कावीळ झाल्यास अनेकदा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. उसाच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात फायबर असते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नसते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी