33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यPalghar News : पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम रखडले, भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सरकारला घरचा...

Palghar News : पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम रखडले, भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सरकारला घरचा आहेर

पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयाची निविदा निघून देखील रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी शिंदे-फडणवीस सरकार यांना या रुग्णालयाचे काम का सुरू होत नाही ? असा सवाल उपस्थित करून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे

पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयाची निविदा निघून देखील रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी शिंदे-फडणवीस सरकार यांना या रुग्णालयाचे काम का सुरू होत नाही ? असा सवाल उपस्थित करून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

शिंदे गट व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर पालघर जिल्हा रुग्णालयासाठी 168 कोटी रुपयांचे टेंडर काढले गेले, मात्र आजतागायत रुग्णालयाचे काम सुरू झाले नाही, या रुग्णालयाचे काम सुरू करण्यासाठी आपणास कोण अडवत आहे ? आपण काम का सुरू करत नाही ? असा सवाल उपस्थित करून पालघर जिल्ह्यातील रुग्णांना व सामान्य नागरिकांच्या गरजेचे असलेले रुग्णालय सरकारने का थांबून ठेवले आहे ? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे उपस्थित केला आहे.

जोपर्यंत जिल्हा रुग्णालय होत नाही तोपर्यंत मी खुर्चीत बसणार नाही अशी शपथ जनाठे यांनी या पूर्वीच घेतली आहे. सभा समारंभात ते खुर्चीवर न बसता जमिनीवरच बसत आहेत ? जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा सरचिटणीसपदी ते कार्यरत आहेत. स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा शासन जुमानत नसेल तर विरोधकांचे व सामान्य नागरिकांचे काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पालघर जिल्हा हा सागरी, नागरी आणि डोंगरी या तीन विभागात विभागला गेलेला आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरांमध्ये सुद्धा अद्ययावत असे, रुग्णालय नसल्यामुळे इथल्या रुग्णांना गुजरात येथील सिल्वासा, वापी, वलसाड या ठिकाणी सरकारी रुग्णालयात घेऊन जावे लागते. सधन कुटुंबातील लोक खाजगी इस्पितळामध्ये जायचे झाल्यास मुंबई किंवा ठाणे गाठावें लागत आहे. मात्र इथल्या गरीब, कष्टकरी रुग्णांना इथल्या सरकारी दवाखान्यात सुद्धा व्यवस्थित उपचार मिळत नसल्यामुळे त्यांना गुजरातला जावे लागते. गेल्या चार एक वर्षापासून मनोर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटरचे काम संथ गतीने सुरू असून, तेही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तिथल्या रुग्णांना उपचारासाठी शेजारच्या राज्यात किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने जिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी जनाठे यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा :
Jitendra Awhad Bail : जितेंद्र आव्हाड तुरूंगाबाहेर, जामीन मंजूर; फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics : वडील शिंदे गटात तर मुलगा म्हणतो मी ठाकरेंसोबतच

IND vs NZ : टी20 विश्वचषक संपताच राहुल द्रविडला ब्रेक! व्ही व्ही एस लक्ष्मण प्रशिक्षकपदी विराजमान

गरजू रुग्णांना लवकरात लवकर न्याय द्यावा
आम्ही या जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजासंबंधी नियमित पाठपुरावा करत आहोत, आम्हाला त्याचे श्रेय नको आहे. मात्र लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू करून जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी, मागणी जनाठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी