35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यकलिंगडचा गरच नव्हे तर बीया अन् सालीही आहेत फायद्याच्या

कलिंगडचा गरच नव्हे तर बीया अन् सालीही आहेत फायद्याच्या

कलिंगड (Watermelon) हे असे फळ आहे जे आरोग्यासोबतच चवीलाही चांगले असते. कलिंगडामध्ये(Watermelon) जवळपास ९० टक्के पाणी असते. उन्हाळ्यात हे खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड(Watermelon) खाण्यावर अधिक भर दिला जातो. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर जाणून घेऊया कलिंगड संपूर्ण फळाचे फायदे. (Watermelon Benefits for health)

कलिंगडचा गरच नव्हे तर बीया आणि सालीही आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. कलिंगडच्या बियांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक घटक आहेत.

कलिंगडामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी -1, बी -2, बी 3, बी -5 आणि बी -6 यासारखे बरेच पोषक घटक असतात. कलिंगडाचा रस शरीरातील विषारी घटक काढून टाकतो. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांनी दिवसातून दोनदा कलिंगडाचा रस प्यायला पाहिजे.

कलिंगडच्या बियांचे फायदे

कलिंगडच्या बिया खाल्ल्याने मुरुम, कोरडेपणा आणि वृद्धत्व त्वचेवर दिसत नाही. बियामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

या बियामध्ये पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज सारखे खनिजे असतात जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

कलिंगडामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे पिण्यामुळे त्वचा बर्‍याच काळासाठी चमकदार आणि ताजीतवानी होते. यामुळे अकाली वृद्धत्व टाळते.

बियांसोबत कलिंगडची सालही ठरते फायदेशीर

वजन नियंत्रित करते

कलिंगडबरोबरच कलिंगडाची सालही वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. कलिंगडच्या सालामध्ये फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी आपण कोशिंबीर म्हणून वापरू शकता. त्यातील कमी कॅलरीमुळे चयापचय वाढते.

रक्तदाब आणि साखर नियंत्रित करते

फायबर समृद्ध कलिंगडाच्या सालामध्ये फायबरची महत्त्वपूर्ण मात्रा असते, ज्यामुळे रक्तदाब आणि साखर पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. याशिवाय फायबर समृद्ध असलेले पदार्थ पचनास मदत करतात तसेच पोट स्वच्छ ठेवतात.

झोप सुधारते

जर आपल्याला झोप लागत नसेल तर आपण कलिंगडाची साले वापरू शकता. यात मॅग्नेशियम असते.

चेहऱ्याच्या सुरकुत्या काढून टाकतात

कलिंगडाची साल लाइकोपीन, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असतात. हे चेहऱ्या यावरील गडद डाग, सुरकुत्या आणि डाग कमी होतात. त्वचेवर टरबूजाची साले घासण्यामुळे केवळ फ्री रॅडिकल्स निष्प्रभावी होत नाहीत तर तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी