30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमंत्रालयMHADA Recruitment 2021 : लिपिक, अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती, १४ ऑक्टोबर...

MHADA Recruitment 2021 : लिपिक, अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती, १४ ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईने १७ सप्टेंबर २०२१ रोजी विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.  (Recruitment 2021 for architects and other departments and writers)पात्र आणि इच्छुक उमेदवार mhada.gov.in वर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

भुसावळमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

मुस्लीम असल्यानेच आर्यन खानला दिला जातोय त्रास : मेहबुबा मुफ्ती

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख – १७ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२१

परीक्षेची तारीख काय?

नोव्हेंबर २०२१

पदांचा तपशील

कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] – १३

उप अभियंता [आर्किटेक्चर] – १३

सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] – ३०

सहाय्यक कायदेशीर सल्लागार – ०२

कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] – ११९

कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक – ०६

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ४४

सहाय्यक – १८

वरिष्ठ लिपिक – ७३

कनिष्ठ लिपिक – २०७

लघुलेखक लेखक – २०

सर्वेक्षक – ११

ट्रेसर – ०७

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी १२ वी पास, पदवी, बीई/ बीटेक (संबंधित विषय) असणे आवश्यक आहे. उमेदवार वेबसाईटवर दिलेल्या अधिसूचनेमध्ये तपशीलवार शैक्षणिक पात्रता तपासू शकतात.

वयोमर्यादा किती?

कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ४० वर्षे

उप अभियंता [आर्किटेक्चर]- १८ ते ३८ वर्षे

प्रशासकीय अधिकारी – १९ ते ३८ वर्षे

सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ३८ वर्षे

कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ३८ वर्षे

कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक- १९ ते ३८ वर्षे

आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक – १८ ते ३८ वर्षे

सहाय्यक – १८ ते ३८ वर्षे

वरिष्ठ लिपिक – १९ ते ३८ वर्षे

कनिष्ठ लिपिक – १९ ते ३८ वर्षे

शॉर्टहँड लेखक – १८ ते ३८ वर्षे

सर्वेक्षक – १८ ते ३८ वर्षे

ट्रेसर – १८ ते ३८ वर्षे

थरार : औरंगाबादेत राहत्या घरात प्राध्यापकाची गळा चिरून निर्घुण हत्या!

Mumbai: MHADA receives 2.24 lakh applications for 8,984 houses

निवड प्रक्रिया कशी असेल?

निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी