27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची जयंत पाटील यांनी केली विनंती

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची जयंत पाटील यांनी केली विनंती

टीम लय भारी

मुंबई : दि. ८ जुलै २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून ९२ नगर परिषद आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

याबाबतची माहिती जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून इम्पिरिकल डेटा गोळा करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अट्टहास करू नये. महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आणि ओबीसी समाजाला आरक्षण पण मिळेल, असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा :

संजय राऊतांचा बंडखोरांना टोला, ५० कोटी पचणार नाहीत

एकनाथ शिंदेंचा विचित्र निर्णय, सधन वर्गाला खुष करण्यासाठी वंचितांना चिरडले

चित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी