33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय महात्मा गांधींबद्दलच्या विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!

 महात्मा गांधींबद्दलच्या विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!

टीम लय भारी 

सांगली: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते लवकरच आपल्या संघटनेची घोषणा करणार असून एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत ते स्वत:चं पॅनेल उभा करणार आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. यावर आव्हाडांनी (Jitendra Awhad) सदावर्ते यांना टोला लगावला. “”त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवावी. Jitendra Awhad on gunratan sadavarte

मला त्यांच्या राजकीय विचारांबद्दल काहीच बोलायचं नाही. पण गांधींबद्दल जो माणूस बोलतो. त्याच्याविरोधात मी बोलणार. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यांनी कुणाबद्दलही बोलावं. पण गांधींबद्दल बोलू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे”, असं आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

“गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटलंच नव्हतं असं गोडसेजींनी कोर्टात ट्रायल झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं”, असं विधान अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केले. या विधानावरुन वाद सुरू झाला आहे. तसेच, गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची मोठी फसवणूक केल्याचं देखील सदावर्ते म्हणाले होते.

किळस वाटते. गांधींनी या देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूसच म्हणू शकतो. ज्या गांधींपुढे नेल्सन मंडेला, जगातले सगळे मोठे नेते नतमस्तक झाले, आजही होतात. या देशातले नेते विदेशात गेले की एकच नाव कानावर पडतं, ते म्हणजे महात्मा गांधी. त्या गांधींबद्दल असं बोलताना त्यांना काहीच वाटलं नसेल का?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा: 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

LIC IPO Subscription Day 5 Updates: IPO Booked 1.73 Times So Far; Retail Oversubscribed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी