25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमंत्रालयपोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्यसरकारने घेतला आहे. पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढवत असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसंच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार असून तो 3 डिसेंबरपासून कार्यरत होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (29 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठक घेण्यात आली. या बैधकीत राज्य सरकारतर्फे अनेक निर्णय घेण्यात आले. याबैठकित घेण्यात आलेले निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. यामध्ये प्रामुख्याने सध्या राज्यभरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या गोंधळावर उत्तर शोधण्यासाठी अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देत असल्याचा निर्णय जाहिर करण्यात आली. याशिवाय अनेक विविध निर्णय घेण्यात आले आहेत.

हे आहेत मंगळवार 29 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार.

– दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार. 3 डिसेंबरपासून विभाग कार्यरत.

हे सुद्धा वाचा

Video : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी !

ऋतुराजने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात धरली होती, 7 षटकारांनंतर आई-वडिलांचे कौतुकोद्गार

एक दिवस आजी-आजोबांसाठी

– अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार.

– सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची 452 कोटी 46 लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

– प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना 1 हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्यांना होणार फायदा.

– गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील 2386 गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी 200 चौ.मी. जागा मोफत देणार.

– अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. 4317 हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ.

– नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चास सुधारित मान्यता. 3659 हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ.

– शासकीय कर्मचाऱ्यांना 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार.

– महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती.

– बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता.

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे 11 लाख 80 लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, घेण्यात आलेले सर्व निर्णय बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आले. यानिर्णयांची लवकरात लवकर अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी