26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमनोरंजनलता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

टीम लय भारी

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल
 मुंबई :  प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.त्यांना कोरोनाची लागण झाली. सध्या त्या 92  वर्षांच्या आहेत.( Lata Mangeshkar contracted corona, dmitted to ICU)

लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणा-याला जबलपूरमधून अटक

कपिल शर्माने घेतली चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी

लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांच्या मोठ्या लेक आहेत.

लता मंगेशकर यांना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. परंतु वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

Bigg Boss 15 l तेजस्वीला बोलताना करण कुंद्राची जीभ पुन्हा घसरली

SCOOP: Makers of Priyanka Chopra, Katrina Kaif, Alia Bhatt starrer Jee Le Zaraa approach Vicky Kaushal to feature opposite Katrina Kaif

त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. त्यांनी आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांना आईसारखं प्रेम दिलं आहे. सध्या चाहते त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी