27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजविद्यापीठातल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

विद्यापीठातल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

टीम लय भारी

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada university) उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) नियोजित पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला(Raigad soil for the statue of Shivaji Maharaj)

विशेष म्हणजे या पायाभरणीसाठी पंचधातूमध्ये राजगडाच्या किल्ल्याची माती आणि चवदार तळ्याचे पाणी आणले होते. ते समारंभपूर्वक पुतळ्याच्या चबुतऱ्यात सोडण्यात आले.

जाणून घ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतला एकूण खर्च आणि शिल्लक

शिवसेना मंत्री संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा

पायाभरणीत रायगडाची माती, ‘चवदार’चे पाणी

विद्यापीठातील छत्रपतींचा पुतळ्याची पायाभरणी मंगळवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील होते.

विजय पाटील यांनीच पंचधातूमध्ये राजगडाच्या किल्ल्याची माती आणली होती. तसेच जगाला समतेचा संदेश देणाऱ्या महाड येथील चवदार तळ्याचे पाणी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पायाभरणी कार्यक्रमात टाकले गेले.

संजय राऊतांचे UPA मध्ये सहभागी होण्याचे संकेत

President Kovind visits Raigad: History and significance of Raigad fort and its importance in Chhatrapati Shivaji’s life

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगीच्या कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठात स्वराज्याची उभारणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे.

छत्रपतींचा हा पुतळा पाहण्यासाठी विविध राज्यांमधून लोक येतील. याकरिता रायगडाची माती आणि चवदार तळ्याचे पाणी आणण्याचा विजय सुबूकडे यांनी केलेला संकल्प आज पूर्ण झाला. या क्षणाची नोंद विद्यापीठाच्या इतिहासात नक्कीच घेतली जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी