28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजSchool : शाळा कधी सुरु करायच्या हे स्थानिक अधिकारी ठरवणार, शिक्षण मंत्री...

School : शाळा कधी सुरु करायच्या हे स्थानिक अधिकारी ठरवणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

टीम लय भारी

मुंबई : राज्यभरात शाळा (School) कधी सुरु करायच्या हे स्थानिक अधिकारी ठरवणार असल्याचे व त्यांना तसे अधिकार दिल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. (Local officials will decide when to start the school, Education Minister Varsha Gaikwad told the media.)

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिका-यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे.

कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी