35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदहा वर्षात १८ ऑपरेशन ,मात्र तो जिद्दीने लढला आणि जिंकला ! मालेगावच्या...

दहा वर्षात १८ ऑपरेशन ,मात्र तो जिद्दीने लढला आणि जिंकला ! मालेगावच्या अमित ओमप्रकाश बाहेतीचा आज होणार गौरव

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हे दिव्यांगत्व आलेले अमित ओमप्रकाश बाहेती (omprakasah baheti) याचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आज गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. जन्माला येणारं प्रत्येक मुलं सुदृढच असतं असं नाही. पण सुदृढ नसतानाही स्वत:च जग निर्माण करतात अशी काही मोजकीच उदाहरणे मिळतात. तुम्ही आजवर अनेक आजारांशी झुंज देणाऱ्या व्यक्तींबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला सेरेब्रल पाल्सी या आजाराशी दोन हात करत यशस्वी झालेल्या अमित ओमप्रकाश बाहेती याची कथा सांगणार आहोत. ( 18 operations in 10 years, but he fought hard and won! Malegaon’s Amit Omprakash Baheti to be felicitated today)

एक ऑपरेशन करायचे ठरले तर आपल्या अनेकांच्या अंगावर काटा येतो ,त्याचा त्रा स , त्यामुळे होणारी धावपळ असो किंवा त्याचे शरीरावर होणारे परिणाम असोत यामुळे भीती वाटते परंतु सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराने ग्रासलेल्या मालेगावच्या अमित ओमप्रकाश बाहेतीवर दहा वर्षात चक्क १८ ऑपरेशन करण्यात आले . ऑपरेशन झाले आणि त्यात त्यांना आधार शाळेचे शिक्षक गोकुळ देवरे , वैशाली देवरे हे दाम्पत्य भेटले आज तेच अमित बाहेती शेअर मार्केटचा अभ्यास तर करताय पण तत्यांची जिद्द बघून Zee Business चे Executive Editor अनिल संगवी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमित यांना भेटण्यासाठीचे निमंत्रण दिले आहे.इतकेच नाही तर आधार संस्थेच्या गीर गाय प्रोजेक्ट मध्ये तो मुख्य पार्टनर देखील आहे . अमित बाहेती आणि अनेकांच्या आयुष्यात नवी पहाट आणून त्यांना सकारात्मक जीवन जगण्यास हातभार गोकुळ आणि वैशाली देवरे या दाम्पत्याच्या मालेगाव येथील आधार संस्थेने लावला आहे.

अमितचे वडील ओमप्रकाश बाहेती,आई दीपा बाहेती ,भाऊ सुमित बाहेती अशा परिवारात अमितचा जन्म 1992 साली झाला. अमित जन्मतः सेरेब्रल पाल्सी
आहे, कुणीही घरात कधी न बघितलेली व ऐकलेली समस्या तर होतीच मात्र अमितचे पूर्ण हात-पाय वाकडे होते. त्याला काहीही बोलता येत नव्हते. आपण बोललेले त्याला काहीच समजत नव्हते. कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. कोणत्याही उद्दीपकाला प्रतिसाद नाही. १९९२ साली म्हणजे आजपासून ३२ वर्षांपूर्वी या समस्याबाबत तज्ञांनाच कल्पना नसल्याने निश्चित उपचार करतांना खूप समस्यांचा सामना करावा लागला.
मात्र बाहेती परिवारातील मित्र, नातेवाईक यांची साथ भक्कम असल्याने त्यांनी उपचारासाठी नवनवीन सेंटर बघण्यास सुरवात झाली. मुंबई, पुणे, कलकत्ता, हैद्राबाद,दिल्ली, उदयपूर या भारतातील नामांकित सर्व सेंटर चे उपचार सुरू झाले. आणि 10 वर्षात मोठमोठी १८ ऑपरेशन देखील झाली. नियतीच्या मनात काय होते माहित नाही पण इतके सारे करूनही सर्वांचे उत्तर एकच होते ते म्हणजे अमित खूप तीव्र अपंगत्वाने ग्रासला आहे. तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. एकाच जागेवर पडून राहील हे सतत अनेकांचे बोलणे आणि समाजाची नकारात्मकता अमितचे मानसिक खच्चीकरण करत होती. तरीही एक दिवस अमित नक्की चांगला होईल या भाबड्या आशेने अमित चे आई-वडील वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करून कामाला लागत कारण त्यांना केवळ आशा नाही तर एक आत्मविश्वास होता कि आपला मुलगा एक दिवस नक्की या आजारातून नक्की बाहेर पडेल.आणि तसेच झाले कारण १९९८ च्या दरम्यान विशेष शिक्षक गोकुळ देवरे हे त्यांना देवदूतासारखे भेटले आणि तेथून अमितच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

मालेगाव तालुक्यातील आधार शाळेत इतर उपचार सोबत स्पीच, फिजिओ व अक्यूपेशनल थेरपीची सुरवात अमित साठी झाली. थोड्याच दिवसात होम टयूशन चा बदल विशेष आधार शाळेत झाला. अमितचा शाळेत प्रवेश घेईपर्यंत त्याला काहीच समजत नव्हते. बोलता येत नव्हते. अशा परिस्थितीत सुरवात फार कठीण होती. मात्र जिद्द आणि आत्मविश्वास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

राज्यातील आदर्श शाळा आधार
आधार शाळेच्या गोकुळ सरांनी व वैशाली मॅडम यांनी कोणाकडून कोणतीच मदत न घेता स्वतः विशेष शाळेचा बदल नैसर्गिक शिक्षण पद्धतीत केला. स्वतःच्या हिम्मत व मेहनतीवर त्यांनी अमित सोबत खूप मुलांना साहित्य साधने उपलब्ध करून दिलीत. अमित ला ज्या वैयक्तिक विशेष सेवा सुविधा मिळणे अपेक्षित होते त्या सर्व वेळेत सुरू झाल्यात. त्याला वैयक्तिक एक विशेष शिक्षक मिळाल्याने बौद्धिक पातळी लक्षात घेता विशेष शिक्षण व थेरपी मिळल्यात.
आधार ही विशेष शाळा नैसर्गिक शिक्षण देणारी राज्यातील आदर्श शाळा म्हणून राज्यात नावारूपाला आली. 400 हून अधिक नक्षत्र वृक्षांचे गार्डन त्यात विविध प्रकारचे प्राणी पक्षी, नेचरल स्टिम्युलेशन थेरपी या पद्धतींचा अमितला खूप मोठा फायदा झाला आहे असे अमित सांगतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी