33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआडगाव ट्रक टर्मिनलमध्ये होणाऱ्या इलेक्ट्रिक बस डेपोला नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा विरोध...

आडगाव ट्रक टर्मिनलमध्ये होणाऱ्या इलेक्ट्रिक बस डेपोला नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा विरोध कायम

आडगांवसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल < truck terminal > विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करून देखील नाशिक मनपा आयुक्ताकडून कुठलाही ठोस निर्णय न होता वेळकाढूपणा होत असल्याने नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघटनेची नाराजी व्यक्त केली आहे. आडगांव ट्रक टर्मिनलच्या प्रश्नावर आज नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मनपा आयुक्ताची भेट घेऊन चर्चा केली. मात्र कुठलाही ठोस निर्णय न होता केवळ वेळकाढू पणा होत असल्याने वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. तसेच जर काम मार्गी लागत नसेल तर प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेच्या वतीने दिलेला आहे.(Nashik District Transport Association continues to oppose electric bus depot at Adgaon truck terminal)

याबाबत संघटनेच्या वतीने पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, आमदार राहुल ढीकले, आमदार देवयांनीताई फरांदे, आमदार सीमा हीरे, आमदार सरोज आहीरे,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देखील निवेदन पाठविले आहे.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी.एम.सैनी, सुभाष जागंडा,रामभाऊ सूर्यवंशी, संजु तोडी,दिपक ढिकले, रमेश शर्मा, शक्ती सिंग, गुरुमेल सिंग उप्पल,सुरेश शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहर हे एक ऐतिहासिक,धार्मिक, शेतीप्रधान,औद्योगीक, थंड हवेचे शहर आहे. तसेच उत्तर व दक्षिण भारतातील मध्यवर्ती शहर म्हणुन नाशिक आहे. राष्ट्रीय लोजिस्टीक पार्क उभारण्याच्या दृष्टीने नाशिक विचाराधीन आहे म्हणून नाशिक मधिल वाहतूक सुरळीत राहावी अपघात कमी व्हावे, वाहतूकोंडी होऊ नये शहरातील जनतेला त्रास होऊ नये अशी दूरदृष्टिकोन ठेऊन वीस वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल विकसित केले होते. यामध्ये शहरातील द्वारका, तपोवन कॉर्नर,जुना आडगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात असलेले गॅरेज व वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने ही आडगांव ट्रक टर्मिनल मध्ये विकसित करण्यात आले होते. या ट्रक टर्मिनल मध्ये व्यापारी गाळे व वाहन दुरुस्तीसाठी ओटे व सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याची वेळोवेळी डाग डुजी करुन आवश्यक व्यवस्था करुन चांगली निगा ठेवली असती तर एक चांगल मॉडेल तयार झालं असत. मात्र तेव्हा पासून संघटनेच्या माध्यमातून वारंवार विनंती करूनही हे ट्रक टर्मिनल दुर्लक्षित ठेवले आणि आता याठिकाणी ईलेक्ट्रिक बस डेपो उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये असंतोष पसरला असल्याचे म्हटले आहे.

ईलेक्ट्रिक बस वाहतूक व्यवहार्य होण्यासाठी हा डेपो शहराच्या अधिक जवळ असणे आवश्यक आहे. मात्र आता हा डेपो शहराच्या बाहेर आडगांव ट्रक टर्मिनल बाहेर १० किलोमीटर अंतरावर निर्माण करण्यात येत आहे. वास्तविक यामुळे जाताना आणि येताना २० किलोमीटर अंतर अधिक खर्ची होणार आहे. त्यामुळे हा डेपो कितपत व्यवहारी होईल याबाबत मोठी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच मार्च २०२३ मध्ये देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी नाशिक शहराच्या चारही बाजूला बंद जकात नाक्यांवर आडगाव ट्रक टर्मिनलसह सर्व जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करावे. तसेच नाशिक हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेती मालासाठी व औद्योगिक मालासाठी राष्ट्रीय लॉजिस्टीक पार्क उभारता येईल अशा सूचना मनपासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र अद्यापही यावर प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही त्यामुळे वाहतूक दारांमध्ये प्रचंड असंतोष कायम असल्याचे म्हटले आहे.

आडगाव सह शहरात सर्व जकात नाक्यांवर निर्माण होणाऱ्या ट्रक टर्मिनल मध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण व्हावे यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र ट्रक टर्मिनल विकसित होणे दूरच राहिले असून या प्रकरणासाठी राखीव असलेला भूखंड देखील इतरत्र वापरला जात आहे ही अतिशय खेदाची बाब असल्याचे सांगत आडगाव येथील ट्रक टर्मिनलचा विकास करतांना येथे सारथी सुविधा केंद्राच्या धर्तीवर याचा विकास व्हावा. या अनुषंगाने ट्रक टर्मिनलमध्ये विश्रामगृह,स्वच्छ्ता गृह, सुरक्षीत वाहनतळ, भोजनालय, प्रशिक्षण केंद्र,व्यसनमुक्ती केंद्र, व्यायामशाळा,मनोरंजन केन्द्र असे परिपूर्ण सोई सुविधा असलेले सारथी सुविधा केंद्र निर्माण व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आडगांव येथील बस डेपो इतरत्र हलावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी