29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रVideo : एका मातेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, माझ्या लेकाला आमदार करा; तो १...

Video : एका मातेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, माझ्या लेकाला आमदार करा; तो १ रूपया मानधन घेईल!

एका मातेने आपल्या (A mother demanded) लेकाला आमदार करण्याची (make her son an MLA) मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या अडीअडचणी समजून घेणारे, त्यांच्यासाठी झटणारे नेते अशी त्यांची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde) यांनाच या मातेने पत्र लिहीले असून माझ्या मुलाला जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पद नसल्याने अनेक अडचणी येतात, त्यामुळे त्याला आमदार करा, तो महिन्याला केवळ एक रुपया मानधन घेईल अशी देखील विनंती त्यांनी या पत्राव्दारे मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे. (A mother demanded Eknath Shinde to make her son an MLA)

या मातेचे नाव सागरबाई गदळे असे आहे, तर त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत असून तो गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करतो असे त्या मातेने म्हटले आहे. मात्र हे काम करत असताना त्याला अडचणी येत आहेत. त्याच्याकडे कोणतेही पद नसल्याने त्याला आमदार केल्यास तो जनतेच्या अडचणी सोडवेल, असे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे. सागरबाई यांनी आपल्या मागणीचा एक व्हिडीओ देखील बनविला असून त्या व्हिडीओतून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुलाला आमदार करण्याची कळकळीची विनंती केली आहे.

हे सुध्दा वाचा

धनगर आरक्षणावर १६ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी

आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाला न्यायालयाचा दणका

मोदींच्या नेतृत्वात, देशाच्या इतिहासात प्रथमच कट्टर मुस्लिम नेता प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणा!

काय म्हटलय पत्रामध्ये ?
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणांस पत्र लिहिण्याचे कारण माझ्या श्रीकांतला आमदार करा (बाबत) मी सागरबाई विष्णू गदळे आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेककरी गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेय त्यामुळे आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो एक रुपया प्रतिमहिना मानधनावर काम करायला तयार आहे. माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकरी, आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील गरीबी हटविण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या श्रीकांतला करायचे आहेत.

व्हिडीओ पहा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी