33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाला न्यायालयाचा दणका

आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाला न्यायालयाचा दणका

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद प़डळकर (Brahmanand Padalkar) यांना एका प्रकरणात तालुका न्यायदंडाधिकारी(Taluka Magistrate) तथा तहसीदारांनी दणका दिला आहे. मिरज (जि. सांगली) येथे बृह्मानंद पडळकर यांनी एका रात्री आठ दुकाने रातोरात पाडली होती. त्यानंतर हा वाद तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला होता. या वादग्रस्त जागेच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी मिळकतदारांचा कब्जा तात्पुरता मान्य केला आहे. तसेच बृह्मानंद पडळकर यांना योग्य ठिकाणी दाद मागायची असल्यास मागू शकतात असेही सांगितले आहे. (Gopichand Padalkarbrother Brahmanand Padalkar against verdict Taluka Magistrate)

ब्रह्मानंद पडळकर यांनी 6 जानेवारी रोजी मिरजेतील आठ दुकाने रातोरात पाडली होती. त्यानंतर दुकानदारांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तालुका न्यायदंडाधिकारी तथा तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी मिळकतदारांचा जागेवरील कब्जा मान्य करत ब्रह्मानंद पडळकर यांना दणका दिला. पडळकर यांनी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असे देखील त्यांनी निकाल देताना म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 

Eknath Shinde Cabinet Expansion : राम शिंदे, गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद नाही; धनगर समाजामध्ये संताप
गोपीचंद पडळकरांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्ते घालणार अभिषेक !

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका

मिरजेत रस्त्यालगतच असलेल्या आठ मिळकती पडळकर यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या होत्या. त्यानंतर पडळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जागेच्या वादाचे प्रकरण देखील तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेले. यावर सुनावणी पार पडली असता तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांनी मिळकतदारांचा कब्जा मान्य करत ब्रह्मानंद पडळकर यांना योग्य त्या ठिकाणी दाद मागू शकता असे सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी