31 C
Mumbai
Friday, February 16, 2024
Homeमहाराष्ट्रखासदारांच्या संपत्तीत कोट्यानुकोटीची उड्डाणे; सुप्रिया सुळेंची संपत्ती किती वाढली?

खासदारांच्या संपत्तीत कोट्यानुकोटीची उड्डाणे; सुप्रिया सुळेंची संपत्ती किती वाढली?

खासदारकीची हॅट्रिक मारणाऱ्या ७१ खासदारांच्या संपत्तीमध्ये कोट्यवधींची वाढ झाल्याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून सन २००९ ते सन २०१९ दरम्यान सलग निवडून येणाऱ्या या ७१ खासदारांची संपत्ती तब्बल २८६ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालातून समोर आले आहे. यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे खासदार असून पहिल्या क्रमांकावर पंजाबमधील शिरोमनी अकाली दलाच्या (SAD) भटींडा मतदारसंघाच्या खासदार हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) या पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक २६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) असून त्यांच्या सपत्तीमध्ये १७३ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे (BJP) ओडीसा राज्यातील पुरी मतदार संघाचे खासदार पिनाकी मिश्रा (Pinaki Mishra) यांचा क्रमांक लागत असून त्यांच्या संपत्तीमध्ये २९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (ADR reports Lok Sabha MPs elected three terms has increased by 286 percent wealth)

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने हा अहवाल प्रसिद्ध केला असून या ७१ खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक 43, त्याखालोखाल काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे प्रत्येकी एका खासदाराचा यामध्ये समावेश आहे. तर ज्या खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे त्यामध्ये भाजपचे सहा खासदार असून राष्ट्रवादीचा एक, शिरोमणी अकाली दलाचा एक बीजेडीचा एक आणि एआययुडीएफच्या एका खासदाराचा समावेश आहे.

एडीआरच्या अहवालानुसार हरसिमरत कौर यांच्या संपत्तीत २००९ ते २०१९ दरम्यान १५७ कोटींची वाढ झाली असून त्यांची २०१९ साली एकुण संपत्ती २ अब्ज १७ कोटी ९९ लाख १९ हजार ८७० रुपये इतकी झाली आहे. या अहवाला नुसार पन्हा निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये ज्यांची संपत्ती वाढली आहे, त्यामध्ये हरसिमरत कौर यांचा पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे असून त्यांची २०१९ मध्ये संपत्ती १ अब्ज ४० कोटी ८८ लाख ८८ हजार ७०४ रुपये असून २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ८९ कोटींची वाढ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे खासदार पिनाकी मिश्रा असून २०२९ मध्ये त्यांची संपत्ती १ अब्ज १७ कोटी ४७ लाख ०१ हजार ३४४ रुपये इतकी असून २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये त्यांची संपत्ती ८७ कोटी रुपयांनी वाढली आहे.

ADR reports Lok Sabha MPs elected three terms has increased by 286 percent wealth

तर चौथ्या क्रमांकावर भाजपचे बंगळुरु मध्य (कर्नाटक) चे खासदार पी.सी. मोहन हे आहेत. त्यांची संपत्ती ७५ कोटी ५५ लाख २९ हजार ३०६ रुपये इतकी असून २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ७० कोटींची वाढ झाली आहे. पाचव्या क्रमांकावर भाजपचे शिमोगा (कर्नाटक)चे खासदार बी.वाय. राघवेंद्र हे असून २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ६७ कोटी ४० लाख ९३ हजार ८५१ रुपये इतकी असून २००९ ते २०१९ या कालावधीत त्यांच्या संपत्तीमध्ये ६० कोटींची वाढ झाली आहे.
त्या खालोखाल सहाव्या क्रमांकावर भाजपचे पिलीभीत (उ.प्रदेश) चे खासदार वरुण गांधी यांचा क्रमांक असून त्यांची २०१९ मध्ये ६० कोटी ३२ लाख ५३९ रुपये इतकी संपत्ती आहे. २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ५५ कोटींची वाढ झाली आहे.

ADR reports Lok Sabha MPs elected three terms has increased by 286 percent wealth

सातव्या क्रमांकावर भाजपचे विजापूरचे खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनगी हे असून सन २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ५० कोटी ४१ लाख २२ हजार ९८५ रुपये इतकी होती. त्यांच्या संपत्तीमध्ये २००९ ते २०१९ दरम्यान ४९ कोटींची वाढ झाली आहे. आठव्या क्रमांकावर ऑल इंडिया युनाईटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) धुर्बी (आसाम)चे खासदार बद्रुद्दीन अजमल हे असून त्यांची २०१९ मध्ये ७८ कोटी ८० लाख ६४ हजार ४४ रुपये इतकी संपत्ती होती. २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ४८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

रावसाहेब दानवे-अशोक चव्हाण यांच्यात फोनाफोनी!

अभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीय संगीतकाराने रचला इतिहास !

सोनालीच्या ‘डेटभेट’साठी प्रेक्षक झालेत आतुर !

नवव्या क्रमांकावर भाजपचे हावेरी (कर्नाटक) चे खासदार उदासी एस.सी. यांचा क्रमांक असून त्यांची २०१९ मध्ये ७१ कोटी ८४ लाख ९९ हजार १९५ रुपये इतकी संपत्ती होती. २००९ ते २०१९ या काळात त्यांच्या संपत्तीमध्ये ३९ कोटींची वाढ झाली आहे. तर दहाव्या क्रमांकावर देखील भाजपच्या सुलतानपुर (उ.प्रदेश)च्या खासदार मनेका गांधी असून त्यांची २०१९ मध्ये ५५ कोटी ६९ लाख २६ हजार ४५१ रुपये संपत्ती होती. २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी