29.9 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयरावसाहेब दानवे-अशोक चव्हाण यांच्यात फोनाफोनी!

रावसाहेब दानवे-अशोक चव्हाण यांच्यात फोनाफोनी!

काँगेसचे नेते अशोक चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. राजकीय क्षेत्रात ते जरी प्रतिस्पर्धी असले तरी वैयक्तिक पातळीवर मात्र या नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे कित्येकदा पाहायला मिळते. सध्या रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना नवीन डबे लावून अशोक चव्हाण यांची विनंती मेनी केली आहे. मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे वाईट अवस्थतेत असून त्याऐवजी नवीन डबे लावण्यात यावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून बोलणेही होत होते. (Discussion between Ashok Chavan and Ravsaheb Danave )

Discussion between Ashok Chavan and Ravsaheb Danave

मराठवाड्यातून धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांच्या डब्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी येत्या फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला नवीन एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. रेल्वे रावसाहेब दानवे यांनी स्वतः याबाबत अशोक चव्हाण यांना फोनवरून ही माहिती दिली. त्याबद्दल अशोक चव्हाण यांनी रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहेत. त्या आशयाचे ट्विटही त्यांनी केले आहे. हा विभाग (मराठवाडा) दक्षिण मध्य मंडळातून वगळून मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला भाजपचे रावसाहेब दानवे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.

Discussion between Ashok Chavan and Ravsaheb Danave

मराठवाड्याला रेल्वेकडून सापत्नपणाची वागणूक
मराठवाड्याला रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी मध्यंतरी केला होता. या विभागातील विकासकामांना रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले होते. नांदेडमधील भोकर येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामासंदर्भात रेल्वे प्रशासनावर त्यांनी ताशेरे ओढले होते. त्यांनी म्हंटले होते की, “रेल्वेच्या मराठवाड्यातील विकासकामांमध्ये होत असलेला विलंब हा समजण्यापलीकडे आहे. दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासन मराठवाड्याला सापत्नपणाची वागणूक देत आहे. यासंबंधी मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी राजकारणात करणार एंट्री

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

ब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा भाजपला थेट इशारा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी