28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादांनी धनंजय मुंडेंच्या खात्याला दिले १३ हजार कोटी

अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या खात्याला दिले १३ हजार कोटी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे सन २०२१-२२ या वर्षाचे अर्थसंकल्प आज जाहीर झाले. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. विधानसभेत दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडें यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास १३ हजार कोटीचा निधी जाहीर केला.

राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारकडून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणाही करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास सर्वसाधारण योजनांसाठी २६७५ कोटी तर अनुसूचित जातीसाठी १०६३५ रुपये असे एकूण १३३१० कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार आहेत. भगवानगड, नारायणगड, गहीनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार आहेत. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार व तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी जाहीर केला आहे.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन १० रू. सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार आहे. अर्थात प्रतिटन उसाच्या मागे महामंडळाला २० रुपये मिळतील, याद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी महामंडळ व्यवस्थापनास उपलब्ध होईल, जोपर्यंत ऊस हे पीक राज्यात घेतले जाईल तोपर्यंत आता ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही! अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी पासून प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सीबीएसई शाळा सुरू करून पथदर्शी प्रकल्प राबविणार जाणार आहे.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी पासून प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सीबीएसई शाळा सुरू करून पथदर्शी प्रकल्प राबविणार आहेत. दिव्यांगत्वाचे २१ प्रकार आणि त्यानुसार दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विविध योजना एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी अद्ययावत मोबाईल/वेब अँपची निर्मिती करणार आहेत. तृतीयपंथीयांच्या स्वावलंबन तसेच विकासासाठी स्वतंत्र बीजभांडवल योजनेची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या सर्व योजना व एकूण कार्यक्रमासाठी १५० कोटी रुपये निधी जाहीर केला आहे.

स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळास आजपर्यंत एक रुपयाही निधी देण्यात आला नव्हता, मागील सरकारच्या काळात अनेकवेळा घोषणा करूनही या महामंडळाच्या रचना किंवा धोरणाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने आता जोपर्यंत ऊस टिकेल तोपर्यंत हे महामंडळ टिकून व स्वयंभू राहील, अशी व्यवस्था केल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी