30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजअजित पवारांच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी घसघशीत तरतूद, शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना; जाणून घ्या बजेटमध्ये...

अजित पवारांच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी घसघशीत तरतूद, शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना; जाणून घ्या बजेटमध्ये कुणाला काय मिळाले ?

टीम लय भारी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’चा दुसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. ‘कोरोना’मुळे आरोग्य सेवेचे महत्व वाढले असल्याचे विशद करतानाच आरोग्य क्षेत्रासाठी घसघशीत तरतूद करीत असल्याचे अजितदादा पवार म्हणाले ( Ajit Pawar presented budget 2021 in Vidhansabha ).

‘कोरोना’ काळात सर्व क्षेत्रांमधील उत्पन्न घटले होते. अवघ्या कृषी क्षेत्राच्या उत्पन्नात 11 टक्क्याने वाढ झाली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी राज्याला तारण्याचे काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही अजितदादांनी विविध योजना जाहीर केल्या ( Ajit Pawar allocated huge money for health and agriculture ).

हे सुद्धा वाचा

महिला दिवस विशेष : पटडीबाहेर जाऊन समाजासाठी झटणारी रणरागिणी

आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार : फडणवीस सरकारने 90 कोटींची खोटी बिले अडवली, ठाकरे सरकारने ती ‘कोरोना’ काळात मंजूर केली

‘शहरातही रोजगार हमी योजना सुरू करा’

महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख करीत अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला. गेल्या वर्षी ‘महाविकास आघाडी सरकार’ पहिला अर्थसंकल्प मी मांडला होता. पण हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर 15 दिवसांतच लॉकडाऊन लागू झाला. ‘कोरोना’मुळे अनेकांचे बळी गेले. बळी गेलेल्या लोकांप्रती अजितदादांनी श्रद्धांजली व्यक्त केली. ‘कोविड’ योद्धे असेलले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस इत्यादींप्रती त्यांनी आदर व्यक्त केला ( Ajit Pawar said, state affected by corona ).

येत्या आर्थिक वर्षात आरोग्य विषयक अनेक प्रकल्प त्यांनी घोषित केले. गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते शहरी भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या अनेक योजना त्यांनी जाहीर केल्या.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी यापूर्वी दिली आहे. आता नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देण्याची घोषणा त्यांनी केली. कृषीपंपाच्या थकीत बिलापैकी 50 टक्के बिल मार्च 2022 फेडल्यास उर्वरीत 50 टक्के विजबिल माफ करण्याचीही घोषणा अजितदादांनी केली ( Ajit Pawar announce budget for farmers ).

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 

आरोग्यसेवा

  • आरोग्य संस्थांचेबांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
  • महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी.
  • कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा.
  • सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक,रायगडआणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये.अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 11 शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रुपांतर.17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचारमहाविद्यालयांचीस्थापना.
  • जिल्हा रूग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये,“पोस्ट कोविड काउन्सिलींग व ट्रीटमेंट सेंटर”
  • सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955कोटी29 लाख रुपये तरवैद्यकीय शिक्षण विभागासाठी1 हजार 941 कोटी 64लाख रुपयेतरतूद.

कृषी विकास

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.
  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये  निधी भागभांडवल.
  • थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना33 टक्के सूट,ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यासराहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी ,44 लाख 37 हजारशेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के,30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ.
  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचामा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प.
  • प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.
  • राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.
  • शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान.
  • कृषी , पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास 3 हजार 274 कोटी रुपये नियतव्यय

जलसंपदा

  • जलसंपदाविभागास 12 हजार 951 कोटी रुपये नियतव्ययप्रस्तावित.

मदत व पुनर्वसन

  • मदत व पुनर्वसन विभागास 11 हजार 454 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित
  • अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

रस्ते विकास

  • नांदेड ते जालना या 200 किलोमीटर लांबीचे 7 हजार कोटी रूपये अंदाजित रकमेचे द्रुतगतीजोडमहामार्गाचे नवीन काम.
  • पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, 170 किलोमीटर लांबीच्या26 हजार कोटी रूपये अंदाजित किंमत.
  • रायगड जिल्हयातील रेवस सिंधुदुर्ग जिल्हयातील रेड्डी या 540 किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी 9 हजार 573 कोटी खर्च अपेक्षित आहे.
  • ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची 40 हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. 10 हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी.1 हजार 700 कोटी रुपयाची तरतूद

रेल्वे विकास

  • पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास मान्यता.प्रस्तावित लांबी 235 किलोमीटर, गती 200 किलोमीटर प्रतितास,अपेक्षित खर्च 16 हजार 39 कोटी रुपये.
  • राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी व विद्युत बसेसमध्ये रूपांतर व बसस्थानकांचे आधुनिकीकरणासाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित.

ग्रामविकास

  • प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाखरूपये उपलब्ध करुन देण्यात येतील.

मनुष्यबळ विकास

  • शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरीता 3 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार.
  • प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक “राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क” स्थापन करण्याचा निर्णय. एकूण 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित.
  • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार. दोन लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.
  • सर्व ग्रामपंचायतींमध्ये “शिवराज्य सुंदर ग्राम अभियान”राबविण्यात येणार.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार.

मुंबईच्या विकासाचे प्रकल्प

  • सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी – न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे नियोजन.वरळी ते शिवडी उड्डाणपूलाचे काम सुरु,3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.
  • 40 हजार कोटी रूपये किंमतीच्या, 126 कि.मी. लांबीच्या,विरार ते अलिबाग “मल्टीमोडल कॉरिडॉर” च्या भूसंपादनाचे कामसुरु.
  • 15 किलोमीटर लांबीचा “ठाणे कोस्टल रोड”,ची उभारणी सुरु,1 हजार 250 कोटी रूपये खर्च अपेक्षित.
  • वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येणार. मुंबई अंतर्गत

 प्रवासासाठी दळणवळण सुविधा-

  • वांद्रे तेवर्सोवा सागरी सेतूचे 17.17 किलोमीटरचे 11 हजार 333 कोटी रूपये किंमतीचे काम सुरु.वांद्रे-वर्सोवा- विरार सागरी सेतू,किंमत 42 हजार कोटी रूपये प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
  • गोरेगाव – मुलुंड लिंकरोड,किंमत 6हजार 600 कोटी रुपये,निविदाविषयक कार्यवाही सुरू.
  • कोस्टल रोड प्रकल्पाचे कामप्रगतीत. सन2024 पूर्वी पूर्ण करणार.

मुंबईतील पर्यटन आकर्षणे

  • हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता

मुंबई येथील पायाभूत विकास प्रकल्प

  • वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडूप , वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय,19 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित.
  • मिठी,दहिसर,पोईसर वओशिवरा नद्या पुनरुज्जीवीतकरण्याची कामे सुरु.

उद्योग, उर्जा व कामगार

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम”योजनेचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी 25 हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दीष्ट.
  • एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गतस्थानिक कारागिर , मजूर व कामगारांनाकौशल्य वर्धनासाठी सहाय्य करून त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार
  • नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.

महिला व बालविकास

  • राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजने अंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.
  • ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंतराज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळासपर्यावरणपूरकदीड हजार सीएनजी व हायब्रीड बसउपलब्ध करून देणार.
  • मोठया शहरातीलमहिलांना प्रवासासाठीतेजस्विनी योजनेतआणखी विशेष महिलाबस उपलब्ध करुन देणार.
  • महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय.
  • राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गटस्थापन करणार.

कामगार

  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतूनअसंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी “समर्पित कल्याण निधी”,बीजभांडवल 250 कोटी रुपये.
  • जव्हार येथे गिरीस्थान पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार
  • वरळी दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
  • पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित
  • राज्यातीलधूतपापेश्वर मंदिर (ता.राजापूर,जि.रत्नागिरी),कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर(ता.शिरोळ,जि.कोल्हापूर),एकविरा माता मंदिर,कार्ले (ता.मावळ,जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर(ता.सिन्नर,जि.नाशिक),खंडोबा मंदिर,सातारा (ता.जि.औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव,जि.बीड),आनंदेश्वर मंदिर,लासूर(ता.दर्यापूर, जि.अमरावती),शिव मंदिर, मार्कंडा (ता.चामोर्शी, जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी 101 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

  • अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठीप्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता 6वीपासून सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार.
  • दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल, असे वेब ॲप्लीकेशन तयार करण्यात येणार.
  • तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना.
  • स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळालानिधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन 10 रुपये आकारुन तेवढाचा निधी शासनाकडून देण्यात येणार.

आदिवासी विकास

  • 100शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर
  • रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत.

इतर मागास बहुजन कल्याण

  • महाज्योती,सारथी व बार्टी या संस्थांनाप्रत्येकी 150 कोटी रुपये,श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपये,शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास50 कोटी रुपये,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास 100 कोटी रुपये,वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला100 कोटी रुपये,मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास 200 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देणार.
  • विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरीता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना” राबविण्याचे प्रस्तावित.
  • औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्याकरीता 3 हजार 487 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित.

तीर्थक्षेत्र विकासआणिस्मारके

  • श्री क्षेत्र परळी वैजनाथ (ता.परळी,जि.बीड), श्री क्षेत्र औंढा नागनाथ (ता.औंढा,जि.हिंगोली),श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.खेड,जि.पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • श्री क्षेत्र जेजुरी गड(ता.पुरंदर, जि.पुणे), श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता.इंदापूर, जि.पुणे),आरेवाडी(ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली) या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांकरीताही निधी उपलब्ध करून देणार.
  • श्रीक्षेत्र मोझरीआणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर (ता.तिवसा, जि.अमरावती),संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगांव(ता.जि.अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड (ता.कळवण,जि.नाशिक), संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर,त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक), श्री क्षेत्र भगवानगड (ता.पाथर्डी,जि.अहमदनगर), श्री क्षेत्र नारायण गडआणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड (ता.पाटोदा,जि.बीड) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड,पाली तसेच सिध्दटेक या श्रध्दास्थानांच्या विकासासाठी“अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत” निधी उपलब्ध करून देण्यात येणार.
  • संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव (ता.जि.हिंगोली) या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा,जि.सोलापूर येथे स्मारक उभे करण्यासाठी सन 2021-22 मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • श्री क्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा,जि.वाशिम)विकास आराखड्याची कामे पूर्ण,करण्याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार.
  • बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये 10 कोटी रुपयांची भर
  • राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांचा कायापालट करण्यासाठी “सुंदर माझे कार्यालय” हे अभियान राबविण्यात येणार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांना पुरस्कार.

अर्थसंकल्प सन 2021-22

  • सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी 11 हजार 35 कोटी रुपये तरतूद उपलब्ध होणार आहे.
  • सन 2021-22 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 1 लाख 30 हजार कोटी रुपये एवढी निश्चित.त्यामध्ये अनुसूचीत जाती उपयोजनेच्या 10 हजार 635 कोटी रुपयेव आदिवासी विकास उपयोजनेच्या 9 हजार 738 कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश.
  • सन 2020-21 च्या अंदाजपत्रकात महसूली जमा 3 लाख 47 हजार 457 कोटी रुपये अपेक्षित. यावर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या राज्य हिश्श्याच्या कराच्या रकमेत 14 हजार 366 कोटी रूपये घट. महसूली जमेचे सुधारीतउद्दीष्ट 2 लाख 89 हजार 498 कोटी रुपये निश्चीत.सन 2020-21 च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 4 लाख 4 हजार 385 कोटी रुपये, सुधारीत अंदाज 3 लाख 79 हजार 504 कोटी रुपये.

सन 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 3 लाख 68 हजार 987 कोटी रुपये व महसुली खर्च3 लाख 79 हजार 213कोटी रूपये अंदाजित.10 हजार 226 कोटी रुपये महसूली तूट. अर्थव्यवस्थेला गती देणे व रोजगार निर्मितीकरीता मुलभूत बाबीवर खर्च करण्यासाठी 58 हजार 748 कोटी रुपये तरतूद. राजकोषीय तूट 66 हजार 641 कोटी रुपये.

 

Appeal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी