29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार म्हणाले, आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार

अजित पवार म्हणाले, आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अद्याप कुलूप आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु करणार? यावर पालकांचे लक्ष लागून आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्यावर सूचक विधान केले आहे. ‘आधी मास्तरांना लस देणार, मग शाळा सुरु करणार’ असे अजित पवार म्हणाले (Ajit Pawar made a suggestive statement on the commencement of school).

राज्यातील शाळा सुरु करण्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सर्व परिस्थितीचा आढावा घेतील. तसेच तिसऱ्या लाटेचा मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.

School reopen : मुलांना शाळेत पाठवायचे की नाही; पालकांमध्ये भीती व संभ्रम

School : शाळा कधी सुरु करायच्या हे स्थानिक अधिकारी ठरवणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

त्याचबरोबर देशातील काही भागात शाळा सुरु केल्यांनतर तिथे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानांतरच शाळा सुरु करण्याचा विचार करू असे ही उपमुख्यमंत्री मम्हणाले.

Ajit Pawar made a suggestive statement on reopening school
आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार

School Edcation : राज्यात शैक्षणिक वर्ष सुरु, पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही!

Maharashtra School Reopening News: Varsha Gaikwad Makes Big Announcement, Says Classes Won’t Resume Now

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होत आहे. लहान मुलांसाठी अद्याप लस उपलब्ध नसली तरी, देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी