29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रतालुक्यातील सर्व गावासह पठार भागातही विकासाच्या योजनांचा वेग कायम : बाळासाहेब...

तालुक्यातील सर्व गावासह पठार भागातही विकासाच्या योजनांचा वेग कायम : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

संगमनेर : आंबी व माळेगाव या दोन्ही गावांनी कायमच सामुहिक पद्धतीने जबाबदारी पार पाडल्यामुळे आपल्याला आज ही सोसायटीची भव्य दिव्य इमारत दिसत आहे. (Balasaheb Thorat said Development plans maintained in all villages and plateau areas of the taluka)

पठार भागातही सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या जात असून संगमनेर तालुका हे ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरत असल्याचे प्रतिपादन गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

नगरपालिकेचा २० वर्षापासुन आर्थीक नुकसान करत रखडलेल्या बहुउद्देशिय सास्कृतिक भवनावर ताबा : मुख्याअधिकारी पल्लवी पाटील यांच सिमोल्लंघन

मुंबई महापालिकेवर भाजप नेते प्रभाकर शिंदेंचा आरोप

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथे उपबाजार समिती, गणपीरदरा धरण जलपुजन, डिजीटल बोर्ड अनावरण, शाळा खोल्यांचे भूमीपूजन व नवीन इमारतीचे अनावरण अशा विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले.

त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार डॉ.सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडाळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेच उपाध्यक्ष माधवराव कानवडे, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, साई संस्थानचे विश्वस्त अॅड सुहास आहेर,  महिला बालकल्याण समितीच्या सभापती मिरा शेटे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे,  लक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे संचालक दत्तात्रय गडगे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की आंबीखालसा ग्रामस्थांनी खूप सुंदर कार्यक्रम केला आहे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाने तसेच आंबी- माळेगाव ग्रामस्थांनी एकत्र येत भव्य दिव्य असे इमारतीचे काम केले आहे स्व.नाथाबाबा शेळके व स्व. प्रभाकरराव भोर या दोन्ही माणसांकडे दूरदृष्टी होती त्यामुळे ते भविष्य काळाकडे दूरदृष्टीने पाहत होती म्हणून आज  पठारभागात अनेक आदर्श गावे पाहवयास मिळत आहे म्हणूनच आज त्यांची आठवण येण साहजिकच आहे.

त्याच प्रमाणे तुम्ही ग्रामस्थांनी उपबाजार समितीस जी जागा दिली आहे त्याचा नक्कीच या भागातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना फायदा होणार आहे  याभागातील पुढची पिढी सशक्त बनण्यासाठी त्यांना खेळाची गरज असते त्यामुळे तुम्ही येथे खेळाच्या मैदानासाठी जागा द्यावी त्याचा फायदा पठारभागातील मुलांसाठी होईल पुढे जावून ना. थोरात म्हणाले की अजय फटांगरे हा युवक काँग्रेस पासून असा वावरेला आहे की साधा गरीबाचा पोरगा हा कार्यकर्ता झाला आहे तो सतत धावपळ ,प्रयत्न  काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामुळे त्याने सभापती पदाचा उपयोग तालुका व जिल्ह्या करीता केला आहे.

फेसबुकवर धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

RS bypoll: Nana Patole, Balasaheb Thorat meet Devendra Fadna .. 

आमदार किरण लहामटे म्हणाले की एखाद्या आमदारालाही लाजवेल असे काम खऱ्या अर्थाने अजय फटांगरे यांनी पठारभागात केले आहे त्याच बरोबर त्यांचा जनसंपर्क अतीशय दांडगा आहे माझ्या विधानसभेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अजय फटांगरे यांचा सिंहाचा वाटा आहे मला निवडूनक लढताना पठारभागात बीलकुल त्रास झाला नाही.आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले राज्यात एकामागून संकटांची मालिका सुरू आहे मात्र अशा कठीण काळात आघाडी सरकारने माघार घेतली नसून हे आघाडी सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे खंबीर पने उभे असल्याचे शेवटी आ.डॉ. तांबे यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब भोर यांनी केले  प्रास्ताविक चेअरमन गोकुळ कहाणे यांनी तर आभार आशोक गाडेकर यांनी मानले. यावेळी सरपंच बाबासाहेब ढोले, दुध संघाचे माजी व्हा.चेअरमन सुभाष आहेर, रमेश आहेर, बबनराव कुऱ्हाडे, व्हा.चेअरमन सोपान भोर, सुनंदाताई भागवत, भाग्यश्री नरवडे, तुळशिनाथ भोर, सर्जेराव ढमढेरे, सुरेश कान्होरे, उपसरपंच रशिद सय्यद, सुरेश गाडेकर, दत्तात्रय कान्होरे,  सरपंच आरूण वाघ, संपतराव आभाळे, शिवाजी तळेकर, गणेश सुपेकर,  विकास शेळके, बाळासाहेब कुऱ्हाडे, यशवंत शेळके, दत्तात्रय शिंदे, यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी