30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रबँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी शुक्रवारी संपावर

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी शुक्रवारी संपावर

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियनच्या वतीने निमंत्रक विराज टीकेकर व सह निमंत्रक धनंजय कुलकर्णी शुक्रवारी (दि.२७) रोजी एकदिवसाच्या देशव्यापी संपाची (strike) घोषणा केली आहे. तसेच गुरुवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनाची सुट्टी, चौथा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टयांमुळे अशी चार दिवस बँक ऑफ महाराष्ट्र बंद असणार आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. (Bank of Maharashtra employees on strike on Friday 27th)

संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२७) रोजी केलेल्या लाक्षणिक संपाची घोषणा ही प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात बँकेचा व्यवसाय 250% पटीने वाढला आहे. 450 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर कर्मचान्यांची संख्या मात्र 20% ने कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वर्षापासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा यामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही. परिनामी कर्मचाऱ्यांना रोज जास्त वेळ काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते आवश्यकतेनुसार सुट्या घेता येत नाहीत. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे. त्याच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे महा बँकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत. सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार मांडली. पण व्यवस्थापन याला कुठलाच प्रतीसाद देत नाही हे लक्षात घेता नाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी २७ जानेवारी संपाची हाक दिली असल्याचे देखील पत्रकामध्ये म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा

शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचा ‘जुन्या पेन्शन’चा डाव!

Video : एका मातेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, माझ्या लेकाला आमदार करा; तो १ रूपया मानधन घेईल!

धनगर आरक्षणावर १६ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी

शेवटचा मार्ग म्हणून आज डेप्युटी चीफ लेबर कमीशनर मुंबई यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कुठलीही तडजोड घडुन आली नाही. या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेच्या वतीने दिलगीरी व्यक्त केली असून असे उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकर भरती या त्यांच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन देखील संघटनेने ग्राहकांना पत्रकाव्दारे केले आहे. संपाच्या दिवशी कर्मचारी आपापल्या शाखांसमोर कार्यालया समोर निर्दशने, धरणे कार्यक्रम संघटीत करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना आपला विरोध प्रदर्शित करतील. या संपात महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे, आवाहन संघटनेने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी