31 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रबेस्ट प्रशासनाने विक्रोळीकरांची मागणी केली पूर्ण

बेस्ट प्रशासनाने विक्रोळीकरांची मागणी केली पूर्ण

टीम लय भारी

मुंबई : बेस्ट प्रशासनाने विक्रोळी कन्नमवार नगर 2 ते रा. ग. गडकरी चौक, दादर या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 354 मार्ग अचानक बदलला होता. मार्ग बदलत प्रशासनाने तो विक्रोळी कन्नमवार नगर 2 ते वडाळा आगार असा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर विक्रोळी परिसरातील रहिवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती (BEST administration fulfil demands of Vikhroli residents).

परंतु, बस क्रमांक 354 पुन्हा जुन्याच मार्गावर धावावी, या मागणीसाठी भाजपच्या विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या महामंत्री केतकी अरविंद सांगळे यांनी यांनी केली होती. या मागणासाठी केतकी यांनी विक्रोळी परिसरातील प्रवाश्यांच्या आणि रहिवाश्यांच्या सह्या घेण्याची मोहीम हाती घेतली होती.

Best : बेस्ट प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा

Best : बेस्ट कर्मचा-यांचीही दिवाळी गोड होणार; 10,100 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

BEST administration fulfil demands of Vikhroli residents
बेस्ट प्रशासनाने प्रसिध्द केलेले परिपत्रक

विक्रोळीकरांच्या सह्यांच्या या मोहीमेला यश मिळाले आहे. बेस्ट प्रशासनाने विक्रोळीकरांच्या सह्यांच्या मोहीमेला मान्यता देत बस क्रमांक 354 चा मार्ग पूर्ववत केला आहे. त्यामुळे बस क्रमांक 354 पुन्हा पुर्वीच्या मार्गावर धावणार आहे.

Best bus accident : बेस्टच्या बसला अपघात; १५ प्रवासी जखमी

100 women-only BEST buses from Saturday

या संदर्भातील परिपत्रकही बेस्ट प्रशासनाने प्रसिध्द केले आहे. बेस्ट प्रशासनाने विक्रोळीकरांची मागणी पुर्ण केल्यामुळे त्यांचे आभार मानले जात आहेत. त्याचबरोबर या संदर्भात पुढाकार घेतल्या प्रकरणी केतकी अरविंद सांगळे आणि त्यांच्या महिला मोर्चाचे कौतुक केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी