27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमनोरंजनभूमि पेडणेकरचा फिमेल ऑर्गजमवर भाष्य करणारा थँक्यू फॉर कमिंग; युट्यूबवर सिनेमाच्या...

भूमि पेडणेकरचा फिमेल ऑर्गजमवर भाष्य करणारा थँक्यू फॉर कमिंग; युट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरचा 1.6 कोटी व्ह्यूज

अभिनेत्री भूमि पेडणेकरने बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे, आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून भूमिपेडणेकरकडे पाहिले जाते. नुकताच भूमिच्या थंक्यू फॉर कमिंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला असून त्याला युट्यूबवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनच दिवसांमध्ये तब्बल दीड कोटी व्ह्यूज ट्रेलरला मिळाले आहेत. फिमेल ऑर्गजम हा चित्रपट बेतला असून भूमि पेडणेकर एका योग्य पार्टनरच्या शोधात असल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

आपल्याकडे लैगिक विषयावर खुल्यापणाने बोलले जात नाही. अनेकदा या विषयावर बोलणे म्हणजे टाळलेच जाते. असे विषय कानात कुजबुजत बोलले जातात. पुरुषांच्या दृष्टीकोणातूनच लैगिक विषय मांडले जातात. एकतर त्यात फॅँटसीच अधिक असते. यामध्ये महिलांचा विचार होत नाही. महिलांच्या लैंगिक आनंद, गरजा, त्यांचे स्वातंत्र्य याबाबतीत स्पष्टपणे बोलणे टाळले जाते. मात्र अशाच विषयावर बेतलेला ‘थंक्यू फॉर कमिंग’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात भूमि पेडणेकर सोबत शेहनाज गिल, डॉली सिंह, कुशा कपिला, शिबानी बेदी यांच्यासह अनिल कपूर आणि करन कुंद्रा यांच्या दखील भूमिका असल्याचे ट्रेलरवरुन दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

हे सुद्धा वाचा 
आवाज वाढीव डीजे तुझ्या… पुण्यात डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचं एकमेकांना आव्हान!
गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार शिल्पा शेट्टी; ‘सुखी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

बाजाली मोशन पिक्चर्स निर्मित हा चित्रपट अनिल कपूरची मुलगी रिया कपूरचा पती करण बूलानीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा खास प्रिमियर शो टोरंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये निवडला गेला आहे. लवकरच हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे. भुमि पेडणेकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर्स पोस्ट केले असून भारतातील महिला आणि पुरुषांच्या नातेसंबंध कसे आहेत याबाबत काही आकडेवारी देखील तीने दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी