31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप आमदार आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

भाजप आमदार आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोनचा विळखा आता अधिकाअधिक घट्ट होत आहे. बुधवारी राज्यात ५८ हजार ९५२ इतके नवीन रुग्ण सापडले होते. राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार  यांनाची कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर, एकीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाने गाठले आहे.

दैनंदिन कामकाजामुळे होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळे लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक आहे. राज्यातील प्रत्येक मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी कोरोनाची काळजी घेताना दिसतात. असे असतानाही लोकप्रतिनिधींना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता भाजप नेते आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आशिष शेलार यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशीरा त्यांनी त्यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘माझी कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला आयसोलेट करावे व वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे,’ असे शेलार यांनी म्हटले आहे.

तसेच, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा करोनाने गाठले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरु आहेत. माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी