27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपाच्या घंटागाडी पार्कींगवर आता सीसीटीव्हींची नजर

नाशिक मनपाच्या घंटागाडी पार्कींगवर आता सीसीटीव्हींची नजर

नाशिक शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. घंडागाड्यांची देखरेख करण्याबरोबरबच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असली तरी मनपाकडून आता घंडागाड्या ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील सहा पैकी चार विभागात सुमारे 28 सीसीटीव्ही यंत्रणा सुरू झाल्याचे समजते. त्याच प्रमाणे कचरा डेपोच्या ठिकाणी देखील लवकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान मनपा एन-कॅपच्या निधीतून हे खर्च करणार असल्याचे समजते. नाशिक शहरात नाशिक पूर्व, पश्चिम, नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड हे सहा विभाग आहे. शहरातील कचरा गोळा करणार्‍या घंटागाड्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नाशिक शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. घंडागाड्यांची देखरेख करण्याबरोबरबच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असली तरी मनपाकडून आता घंडागाड्या ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील सहा पैकी चार विभागात सुमारे 28 सीसीटीव्ही यंत्रणा सुरू झाल्याचे समजते. त्याच प्रमाणे कचरा डेपोच्या ठिकाणी देखील लवकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.
यासाठी सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान मनपा एन-कॅपच्या निधीतून हे खर्च करणार असल्याचे समजते. नाशिक शहरात नाशिक पूर्व, पश्चिम, नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड हे सहा विभाग आहे. शहरातील कचरा गोळा करणार्‍या घंटागाड्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठेकेदाराकडून 450 घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करून तो महापालिकेच्या खत प्रकल्पावर जमा करण्यात येतो. कचरा गोळा करण्याचे काम झाल्यावर या घंटागाड्या वाहनतळ येथे उभ्या करण्यात येतात. त्याठिकारी घंटागाड्यांमधून बॅटरी, डिझेलची चोरी होण्याचे प्रकार रोखण्यासाठी ठेकेदारांनी वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच खासगी सुरक्षारक्षकही नेमले आहेत. तरी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या वाहनतळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या ठिकाणी बसले सीसीटीव्ही
नाशिक पश्चिमच्या गाड्या उभ्या राहणार्‍या द्वारका येथील कन्नमवार पुलाजवळ, पंचवटीच्या नवीन गणेशवाडी, नवीन नाशिकच्या खत प्रकल्प जवळ व नाशिकरोडच्या सिन्नर फाटा या चार ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आहे. तर सातपूर व मध्य नाशिकसाठी खाजगी जागा असल्याने त्या ठिकाणी यंत्रणा लावण्यात आली नाही, मात्र त्या ठिकाणी लावण्यात येणार्‍या सीसीटीव्ही खत प्रकल्पात लावण्यात येणार असल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी