28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाचा पाणीचोरटयांना दणका

नाशिक मनपाचा पाणीचोरटयांना दणका

महापालिका पाणी पुरवठा विभाग व करसंकलन विभागाने संयुक्त मोर्चा उघडत शहरातील पाणीपट्टी थकबाकीदार व अवैध नळ कनेक्शनधारकांना रडसरवर घेतले अाहे. गुरुवारी (दि.२२) पहिल्याच दिवशी वीसजणांचे नळ कनेक्शन कट करुन जोरदार दणका दिला. ज्यांनी पाणीपट्टी थकवली असेल अथवा अवैध नळ कनेक्शन घेतले असेल त्यांनी स्वत:हून मनपास सहकार्य करावे अथवा कारवाईला समोरे जावे असा इशारा दिला आहे. महापालिकेची पाणी गळतीचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर पोहचले असून शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन धारक पाणी चोरी करत आहे. शिवाय पाणीपट्टी थकबाकीचा आकडा नव्वद कोटींवर पोहचला आहे.

थकबाकी व अवैध नळ कनेक्शमुळे मनपाला हक्काचा उत्पन्नावर पाणी सोडावे लागत अाहे. त्यावर अखेर मार्ग काढत पाणी पुरवठा व करसंकलन विभागाने शहरातील सहाही विभागात संयुक्त मोहीम उघडली. पथक पन्नास हजारांपेक्षा जादा थकबाकी असलेल्या नागरिकांच्या घरी भेटी दिल्या जात आहेत. थकबाकीबरोबरच नळ कनेक्शन अवैध आहे का, याची तपासणी करत आहे. पहिल्याच दिवशी वीस थकबाकीदांचे नळ कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई करण्यात आली. पुढिल आठवड्यापासून या मोहीमेची व्याप्ती आणखी वाढवली जाणार आहे. या अगोदर मनपाने ‘अभय’ योजना राबवत अवैध नळ कनेक्शन धारक व थकबाकीदारांना कारवाईपासून सवलत दिली होती. पण त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ही धडक कारवाई मोहीम उघडण्यात आली आहे.

शहरातील सहाही विभागात धडक मोहीम राबवत पहिल्या दिवशी वीसजणांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. या मोहीमेची व्याप्ती आणखी वाढवली जाणार आहे. थकबाकीदार व अवैध नळ कनेक्शनधारकांनी कारवाई टाळण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत मनपास सहकार्य करावे.
– संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी