33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित नाही

टीम लय भारी

मुंबई : आरक्षण देण्याचा अधिकार हा त्या – त्या राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र सरकारची काही भूमिका नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखविण्याचे प्रकार बंद करा, असा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला ( Chandrakant Patil alleged on Mahavikas aghadi over Maratha reservation ).

महाविकास आघाडी सरकारमधील काहीजण मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. या काहीजणांना मराठा समाजाला आरक्षण मिळवू द्यायचे नाही, असेही ते म्हणाले.

तामिळनाडूसह ९ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. तिथे आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही. पण महाविकास आघाडी सरकरामधीलच काही जणांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटत नाही. येत्या ८ ते २० मार्च या कालावधीत मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारने ही न्यायालयीन लढाई नीट लढली नाही व मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा पाटील यांनी दिला ( Chandrakant Patil attacks on Thackeray government ).

हे सुद्धा वाचा

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

जगात फक्त जैवविविधताच करू शकते विषमुक्त शेती, काय आहे सेंद्रिय शेती, काय आहे जैवाविविधता ??? 

भाजप सरकारने धनगर समाजासाठी 1 रुपयाही दिला नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 1000 कोटीची केली होती घोषणा : धनंजय मुंडे यांचे टीकास्त्र

Maratha reservation: SC to begin final hearing both physically and virtually from March 8

Maratha Quota: Constitution Bench of Supreme Court To Begin Final Hearing From 8th March

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारवर तोफ डागली. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत उच्च न्यायालयात युक्तिवाद करुन हा विषय नीट सप्रमाण समजावून सांगितला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयात कन्व्हिन्स करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले ( Chandrakant Patil said, Mahavikas Aghadi government failed in court on Maratha reservation ).

Chandrakant Patil on Maratha Reservation
मराठा आरक्षणाचा विषय चिघळतच चालला आहे

तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. पण त्या आरक्षणाला अद्यापही स्थगिती नाही. त्यासंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मराठा आरक्षणाचा विषय आता ११ न्यायाधिशांसमोर सुनावणीसाठी येणार आहे. येत्या ८ ते २० मार्च दरम्यान या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू ताकदीने मांडली पाहिजे.

आरक्षण देण्याचा अधिकार हा त्या – त्या राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र सरकारची काही भूमिका नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखविण्याचे प्रकार बंद करा. केंद्र सरकारने फक्त आर्थिकदृष्टया मागास घटकांना १० टक्के आरक्षण दिले आहे. पण त्यामध्येही न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तसेच राज्यांना आता जातीचे आरक्षण देता येणार नाही असा केंद्राने कायदा केला आहे.

तसे आरक्षण दयायचे असेल तर त्या राज्यांच्या राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींकडे पाठविण्यात यावा असे कायद्यात आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने हा निर्णय २०१४ मध्ये घेतला आहे, त्यामुळे आपल्याला हा कायदा लागू होत नाही असेही पाटील यांनी निर्दशनास आणून दिले.

तामिळनाडू सरकारने स्वत: आरक्षण दिलं. तामिळनाडू सरकार केंद्राकडे गेलं नव्हतं. इतर राज्याने आपल्या ताकदीवर जसं आरक्षण दिलं आणि टिकवलं. तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकवलं पाहिजे. असेही त्यांनी ( Chandrakant Patil ) स्पष्ट केले.

गायकवाड कमिशनचा अहवाल २७०० पानांचा आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे अजूनही मराठीत भाषांतर करण्यात आलेले नाही. हा अहवाल कोणत्या मंत्र्याने वाचला आहे? एकाही मंत्र्याचा या अहवालावर अभ्यास नाही. मंत्र्यांनी हा अहवाल वाचला असेल तर त्यांनी माझ्यासमोर चर्चेला यावं, असे आव्हानही पाटील यांनी यावेळी दिले ( Chandrakant Patil challenged to Ministers ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी