38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार श्रीकांत शिंदे यांच्या नाशिकमधील घोषणेने महायुतीत वाद वाढणार

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नाशिकमधील घोषणेने महायुतीत वाद वाढणार

महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी नाशिकमधील मेळाव्यात सांगत सांगत नवा तिढा निर्माण केला आहे , हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे, असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये कार्यकर्ता सवांद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत लावली. या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली.“हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगा की, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण हा नाशिकमध्येच राहीला पाहिजे. मी त्यांना सांगू इच्छितो की, आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हेमंत आप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमताने पाठवायचं आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

श्रीकांत शिंदे यांची ही घोषणा भाजपला मान्य असणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार?आणि त्यावरून काय राजकीय वाद वाढणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्या मंदिर, 370 कायदा, सीएए कायदा हे सगळे मोदींनी पूर्ण केले आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत. अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार महायुतीचे खासदार पाठवायचे आणि त्यात हेमंत गोडसेंनाही पाठवायचे आहे. फक्त गोडसेंनी काम करायचे, असे नाही आपण सगळ्यांनी काम करायचे आहे, घराघरापर्यंत आपले काम पोहोचवायचे आहे, असे श्रीकांत शिंदें म्हणाले.

नाशिकमधून शांतिगिरी महाराज हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेचे तिकीट कट होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता श्रीकांत शिंदेंनी एकप्रकारे हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान १२ खासदारांच्या पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचा उमेदवार जाहीर केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी