33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रबीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरुन जेएनयूमध्ये गोंधळ

बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरुन जेएनयूमध्ये गोंधळ

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत असलेला इंडिया : द मोदी क्वेश्चन या बीबीसीच्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरुन मोठी खळबळ उडाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी एका नोटीस काढून ही डॉक्यूमेंट्री स्क्रीनिंग करु नये असे म्हटेल होते. तरी देखील जेएनयू विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी स्क्रीनिंग करण्यासाठी आग्रही राहिल्याने विद्यापीठाने विद्यापीठाने वीज आणि इंटरनेट सुविधा खंडीत केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लॅपटॉप आणि मोबाईलवर डॉक्यूमेंट्री पाहिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्यूमेंट्री स्क्रीनिंग केले नाही ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर पाहिल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले. दरम्यान डॉक्यूमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याचा दावा केला जात असून विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठात मोर्चा काढला.  (Controversy in JNU over screening of BBC documentary on PM Modi)

हा माहितीपट दाखविल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही आणि कोणताही सांप्रदायिक सलोखा बिघडणार नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. जेएनयू विद्यार्थी संघटनेने म्हटले होते की, या आधी विद्यापीठ परिसरात द काश्मीर फाईल्स चित्रपट दाखविण्यात आला होता. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही आडकाठी आणली नव्हती. आणि आम्ही देखील त्याला विरोध केला नव्हता. त्यामुळे आता हा माहितीपट दाखविण्यासाठी आमची अडवणूक केली जावू नये. राज्य घटनेने प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आम्ही हा माहितीपटाचे स्क्रीनिंग करु असे म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

वनडेमध्ये देखील टीम इंडिया नंबर वन; न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव

एमपीएससीच्या तांत्रिक घोळामुळे उच्च पत्रकारिता पदवीधर अर्जाला मुकले; पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; केवळ मंत्रिमंडळ विस्तार नव्हे, ‘या’ मुद्द्यांवर देखील होऊ शकतात खलबते

मंगळवारी (दि. २४) रोजी रात्री नऊ वाजता या माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार होते. मात्र हा माहितीपट दाखविण्यासाठी जेएनयू प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. विद्यापीठ प्रशासनाने या माहितीपटाच्या स्क्रीनिंगसंदर्भातील पत्रके वाटणे आणि तो दाखविण्याविरोधात सख्त कारवाईचा इशारा दिला होता. तसेच माहितीपट दाखविल्यास विद्यापीठात शांतता आणि सलोख्याला बाधा निर्माण होईल असे देखील विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी