टीम लय भारी
मुंबई : ‘बाळासाहेबांच्या पिल्ल्या… केवढी कसोटी ( Covid19 ) आहे लेकरा तुझी. तू खरं बाळासाहेबांचं रक्त आहेस. मीनाताईंचं रक्त आहे तुझ्यात. समर्थपणे पुढे चालला आहेस. खरं सागू, एवढा सिंपल मुख्यमंत्री. काहीच बदल नाही तुझ्यात. वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील.’ हे उद्गार आहेत ज्येष्ठ सामाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे.
उद्धव ठाकरे व सिंधुताई सपकाळ यांच्यातील संवाद ऐका जसाच्या तसा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिंधुताई सपकाळ यांचा आज फोनवरून संवाद झाला. यावेळी सिंधुताई सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले. ‘कोरोना’च्या ( Covid19 ) संकटात उद्धव ठाकरे चांगलं काम करीत असल्याची पोचपावतीच सिंधुताईंनी दिली. उद्धव ठाकरे व सिंधुताईंमधील संवादाची ही ऑडीओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
कोरोना आपत्तीमध्ये उद्धव ठाकरे ( Covid19 ) यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकार उत्कृष्ट काम करीत असल्याची जनभावना आहे. अशातच आता सिंधुताई सिंधुताई सकपाळ यांनी ठाकरे यांचे तोंड भरून स्तुती केली आहे.
हे सुद्धा वाचा
Coronavirus : अजित पवारांनी सांगितले, उद्धव ठाकरेंना आमदारकी देण्याचे कारण