28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रदलित महिलेला विवस्त्र करुन सावकाराने तोंडावर केली लघवी; 1400 रुपयांच्या कर्जाचा...

दलित महिलेला विवस्त्र करुन सावकाराने तोंडावर केली लघवी; 1400 रुपयांच्या कर्जाचा वाद

सावकार आणि त्याच्या साथीदारांनी एका दिलीत महिलेला मारहाण करुन तीच्या तोंडावर लघवी केल्याचा गंभीर प्रकार बिहारमधील खुशरुपूर येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. महिलेच्या पतीने 1400 रुपयांचे कर्ज सावकाराकडून घेतले होते. कर्ज फेड करुन देखील सावकार पैशांचा तगादा लावत होता. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर सावकार आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला मारहाण केली, तसेच तिच्या अंगावर लघवी केली.

ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी खुशरुपूर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. खुशरुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनुसुचीत जातीच्या महिलेला सावकाराने मारहाण केली. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्यची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा 
भेसळखोरांनो, तुमचे दिवस भरले…
धनगर आरक्षणाबाबतचे पत्र घेऊन गिरीष महाजन सकाळी चौंडीला जाणार
सलमान-शाहरुखची बाप्पाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि आरोपी यांच्यामध्ये कर्जाच्या पैशातून वाद झाला होता. या वादातून आरोपीने महिलेला मारहाण केली. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर मारहाण, विवस्त्र करणे आणि तोंडावर लघवी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिलेला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद सिंग आणि त्याचा मुलगा अंशू सिंग हे दोघे फरार असून पोलि्सांकडून त्यांची शोधमोहीम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने प्रमोद सिंग याच्याकडून 1400 रुपये कर्जाऊ घेतले होते. ही रक्कम त्याने व्याजासह परत केली होती. मात्र सिंग याने पैशांचा तगादा लावला होता. आम्ही अधिकचे पैसे देण्यास नकार दिल्याचे दिल्याचे महिलेने म्हटले.


दरम्यान या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर बिहारमधील सत्ताधारी जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनी दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. पाटण्यात 1400 रुपयांचे कर्ज फेडून देखील दलित महिलेकडे पैशांचा तगादा लावला. पैसे देण्यास नकार दिल्याने तिला विवस्त्र केले, मारहाण केली, तिच्या अंगावर लघवी केली आणि प्यायला लावली. पीडित महिलेने यापूर्वी देखील पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतू त्यावर कारवाई केली नाही, असे स्वाती मालीवाल यांनी एक्स (ट्विटर)वर म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी