29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रmanoj jarange;मराठ्यांना मारलं त्यांची फडणवीसांनी बढती केली

manoj jarange;मराठ्यांना मारलं त्यांची फडणवीसांनी बढती केली

मराठ्यांना मारलं त्यांची फडणवीसांनी बढती केली

परभणी

मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. परभणी दौऱ्यावर असणाऱ्या जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला. त्या एसपींची पुण्यामध्ये बढती केली.माता भगिनींना मारणाऱ्यांची बढती फडणवीस करतात.त्या आया बहिणींना अजून चालता येत नाही.मारणाऱ्या पोलिसांची फक्त दहा दिवसांसाठी निलंबित केले, हा मराठ्यांच्या वर अन्याय असल्याचे सुद्धा जरांगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या वेळी सांगितले त्या त्यावेळी आपण थांबलो.उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं ऐकूण ते आपल्याबद्दल चुकीचे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मराठा आहेत. मराठा समाजाने यांना खूप दिले पण यांनी मराठा समाजासाठी काही दिले नाही, असा आरोप ही जरांगे पाटीलांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी