26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

नाशिकमध्ये दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

आपल्या दिव्यांगत्वाचा बाहु न करता आपणही इतरांप्रमाणे क्रीडा स्पर्धांमध्ये कमी नाही असाच जोश घेऊन जिल्ह्यातील सुमारे ८०० दिव्यांग विद्यार्थ्यांनी येथील सेंट झेवियर स्कूलचे मैदान मैदान दुमदुमून सोडले होते.निमित्त होते दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा. येथील नाशिक जिल्हा समाज कल्याण कार्यालय व सक्षम फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने आज रोजी सेंट झेवियर स्कूल नाशिक रोड नाशिक येथे स्पर्धांचे उद्घाटन समाज कल्याणाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.माधव वाघ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थाचे मुख्याध्यापक, शिक्षक, सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी श्री.राम पवार, श्रीमती देवयानी मॅडम उपस्थितीत होते.

कार्यक्रमांचे प्रायोजकत्व सक्षम फाउंडेशन नाशिक या संस्थेने घेतले होते. स्पर्धा यशस्वी होणेसाठी विकास मंदिर संस्था, प्रबोधिनी संस्था यांनी अनुक्रमे भोजन व नाश्ता याची जबाबदारी स्वीकारली होती. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना महिंद्रा व बॉश कंपनीमार्फत उन्हाच्या पार्श्वभूमीवर कॅप वाटप करण्यात आल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २९ अनुदानित व विनाअनुदानीत शाळा व कार्यशाळा यांनी सहभाग नोंदवला होता.तसेच एकूण २०६ क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा (जलतरणसह) घेण्यात येवून व त्यात एकूण ७९५ विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसह लक्षवेधी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेमध्ये अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, कर्णबधिर व बहु विकलांग प्रवर्गातील ८ ते २५ वर्षाखालील मुले मुली यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर ५०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्पोर्टजंप, बुद्धिबळ, इत्यादी प्रकारचे खेळ घेण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी