29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं? ; रूपाली चाकणकरांचा सवाल

डॉ. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं? ; रूपाली चाकणकरांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :-  नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिल्लीहून रेमडिसीवर इंजेक्शन आणल्याचा दावा केलेले नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याबद्दल राष्ट्रवादीने शंका उपस्थित केली आहे (BJP MP Dr. The NCP has raised doubts about Sujay Vikhe). ‘सुजय विखेंचा हा दावा संशयास्पद (‘Sujay Vikhen’s claim is dubious) वाटत असून त्यांनी ही इजेक्श्न्स खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे (State President of NCP Women’s Congress Rupali Chakankar has done it).

नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना, भाजपचे खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट (BJP MP Dr. A video post on social media by Sujay Vikhe Patil) करुन, खासगी विमानाने दिल्ली येथून रेमडेसिव्हिर इंजेक्शन नगरमध्ये आणले असल्याचे म्हटले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे (Dr. Sujay Vikhe Patil has been criticized). ‘विखेंनी नगरमधील जनतेत संभ्रम निर्माण करून या जनतेची चेष्टा करण्याचे पाप करू नये,’ असेही चाकणकर यांनी सुनावले आहे.

गेल्या आठवड्यात डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांनी दिल्लीहून एका खासगी विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. शिर्डीत आलेल्या विमानातून बॉक्स उतरवताना आणि ती वाहनातून नेली जात असतानाचे ही व्हिडिओत दिसले.

‘घाबरू नका, मोदीच पुन्हा येणार’; अनुपम खेर यांच्या विधानावर लोकांचा संताप

मोफत लस देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे वाढला संभ्रम

या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ”खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ (Video of MP Sujay Vikhen) आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे”, असल्याचे म्हणत चाकणकर यांनी टीका केली आहे.

”एकतर सुजय विखेंच्या त्या बॉक्स मध्ये काय होते (What happens in that box of Sujay Vikhen), हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हिर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी”, अशी मागणीही चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान, डॅा. सुजय विखे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता (Dr. Sujay Vikhe had uploaded a video on social media). त्यामध्ये (ता. 19 एप्रिल) रोजी त्यांनी दिल्लीला गुपचूप वारी केली. तेथील एका कंपनीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन खासगी विमानाने ते आले. विमानातूनच त्या वेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता. नंतर तो सोशल मीडियावर टाकला होता.

Fact check: Did states fail to use PM-Cares funds allocated by the Centre to build oxygen plants?

सोशल मीडियावर टाकललेल्या व्हिडिओमध्ये विखे पाटील म्हणाले (Vikhe Patil said in the video posted on social media) होते की, माझ्या परीने जमेल ती मदत मी नगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुले तडफडून मरताना पाहत आहे. ते मला पाहवत नाही. मला ज्यांनी खासदार केले, निवडून दिले, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये पैसा कमावण्याचा कोणाचाच उद्देश नाही. लोकप्रतिनीधी म्हणून हे करणे आमची जबाबदारी आहे. याबाबत मला समाधान आहे, की मी हे इंजेक्शन आणू शकलो.

माझ्या मनात पाप नाही. मी तेथील फॅक्टरीत गेलो. तेथे माझ्या मैत्री-संबंधाचा वापर केला. मदत घेतली आणि ही औषधे घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही, हे माहित नाही. खासगी विमानाने ही औषधे आणली आहेत. माझ्या मनात पाप नाही. त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही डॅा. विखे पाटील यांनी म्हटले होते (Dr. Vikhe Patil had said).

 

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी