26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक सावाना' च्या वतीने कार्यक्षम खासदार अन् आमदार पुरस्कार प्रदान

नाशिक सावाना’ च्या वतीने कार्यक्षम खासदार अन् आमदार पुरस्कार प्रदान

पवित्र भूमीत पुरस्कारासाठी माझी निवड झाली माझे भाग्य आहे. १८६ वर्षाची सांस्कृतिक परंपरा अखंड जपणाऱ्या ‘सावाना’ च्या या पुरस्काराने पुढील काळात १० पट अधिक क्षमतेने काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे. आंतरमनाला पुस्तक समाधान देऊन समृध्द करत असते, असे काम हे वाचनालय करत असल्याने कौतुकास पात्र असल्याचे मत वनमंत्री सुधीर मुंनगट्टीवार यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. सावाना’ च्या वतीने परशूराम साय खेडकर सभागृहात कार्यक्षम खासदार अन् कार्यक्षम आमदार पुरस्कार अनुक्रमे केंद्रिय आरोग्य व आदिवासी राज्य मंत्री भारती पवार आणि सुधीर मुंनगट्टीवार यांना गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर सावाना चे अध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव , अभिजित बगदे, डॉ.धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्रशांत जुन्न रे, जयेश बर्वे, प्रेरणा बेले आदी उपस्थित होते.
मुंनगट्टीवार म्हणाले की राजकीय लोकां च्या वाट्याला तिरकस्कर जास्त असतो . परंतु या ठिकाणी पुरस्कार मिळाला. शब्दाची शक्ती दिली त्याबद्दल आभारी आहे. १९९५ पासून ६ टर्म आमदार आहे. परंतु पहिल्यांदा आमदार झाल्यावर वाचनालय सुरू केले. त्यानंतर अनेक वाचनालय सुरू केले असे सांगितले.

आमदार देवयानी फरांदे यांचा अभिजित बगदे , शोभाताई नेर्लेकर यांचा प्रेरणा बेले , ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांचा जयेश बर्वे यांनी सत्कार केला. पाठक यांनी निवड समितीच्या सदस्य म्हणून प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. ओमकार वैरागकर व सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमास आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, भाजप शराराध्यक्ष प्रशांत जाधव , ऍड नितीन ठाकरे, सुनिल केदार, प्रदीप पेशकर, उत्तम उगले, डॉ मंजुषा दराडे, रोहिणी नायडू, संगीता जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्य वर व नागरीक उपस्थित होते.

हे ही वाचा

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघडीकडून हिरवा कंदील

पुष्कर जोगचं ‘ते’ विधान आणि मनोरंजन क्षेत्रातून संतापाची लाट

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

वाचनालयाची १८३ वर्षाची परंपरा आजही कायम – भारती पवार

वाचानालयाची मी वाचक आहे. वाचनालयाची १८३ वर्षाची परंपरा आजही कायम आहे. पुरस्कार हा गौरवाचा असून जबाबदारी वाढली आहे. ऊर्जा मिळणारा पुरस्कार आहे. पुढील काळात वाचनाल्यास आणखी शक्य तेवढी मदत करणार आहे, असं भारती पवार, केंद्रिय आरोग्य व आदिवासी राज्य मंत्री यांनी बोलताना सांगितलं आहे.

१ लाख १ हजार सन्मान वाचनालयाला निधी दिला. पुरस्काराची रक्कम ५० हजार रुपये आहे. या रकमेत पुरस्काररार्थी भारती पवार आणि मुंनगट्टीवार यांनी ५१ हजाराची भर टाकत १ लाख १ हजार सन्मान निधी वाचनालयाला दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी