32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसंत साहित्य संमेलन येत्या ११ तारखेपासून, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !

संत साहित्य संमेलन येत्या ११ तारखेपासून, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !

महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी परभणी येथे वारकरी संत साहित्य संमेलन परिषदेच्या वतीने 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Sant Sahitya Samelan from coming 11th, presence of CM!)

येत्या 11 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी परभणी तालुक्यात अखिल भारतीय वारकरी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाला अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहून वारकरी सप्रदांयाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. वारकरी सप्रंदायचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी ही माहीती दिली.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत साहित्य दिडीं शुभांरभ होणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सहकार मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदीपान भूमरे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, मंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या कार्यकार्णीची जबाबदारी सुरेश ओरपुडकर पार पाडीत असून, स्वागताध्यक्ष रत्नाकर गुठे असणार आहेत. त्याचप्रमाणे या समारंभासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांनी पुढाकार घेतल्याची माहिती संमेलनाच्या आयोजकांनी दिली आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून या भव्यदिव्य दिंडीला शुभारंभ होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते संत तुकाराम महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणपर्यंत ही दिंडी चालणार आहे. या संमेलनात भव्यदिव्य परिसंवाद, कीर्तन, भजन, भारुड, अभंग असे अनेक कार्यक्रम होणार असून यावेळी 25 हजार भक्तंगण उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विश्व मराठी साहित्य संमेलन; पण ठाकरेंना निमंत्रणच नाही!

साहित्य संमेलनात पुस्तकविक्रेत्यांची भोवनीदेखील होईना; हजारो रुपये भाडे घेऊन स्टॉलधारकांना आयोजकांनी सोडले वाऱ्यावर!

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

दरम्यान, राज्यातील सर्व वारकरी समुदाय आणि परभणीकरांना या संत साहित्य संमेलनाला उपस्थित राहून वारकरी संप्रदायाची शान वाढवण्याचे आव्हान वारकरी सप्रंदायचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी केले आहे. या संमेलनासाठी अनेक पदाधिकारी यशस्वीतेकरीता मेहनत घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी