31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळात सातबारा निर्माण केला : डॉ. उज्ज्वला...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळात सातबारा निर्माण केला : डॉ. उज्ज्वला हाके

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी त्या काळामध्ये अनेक अनिष्ट रूढी परंपराना तिलांजनी दिली. सती प्रथा, मंदिर प्रवेश, महिलांची पहिली फौज त्यासोबत विशेष म्हणजे सातबारा त्यांनी त्यांच्या काळात निर्माण केला, अशा अनेक लोकोपयोगी कार्यामुळे (Public works) त्या लोकमाता व पुण्यश्लोक झाल्या असे प्रतिपादन भाजपा भटके विमुक्त महिला आघाडी व भाजपा वैद्यकीय आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. उज्ज्वला हाके (Dr. Ujjwala Hake) यांनी केले. पुणे येथे दलित स्वयंसेवक संघ अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वाख्यान माला आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘लोकमाता प्रजादक्ष अहिल्याबाई होळकर’ या विषयावर डॉ. उज्वलाताई हाके यांनी वाख्यान दिले. (Ahilyabai Holkar created Satbara during that period Said Dr. Ujjwala Hake)

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकताना अहिल्याबाई होळकर यांनी काश्मीर ते कान्यकुमारी संपूर्ण भारतभर केलेल्या लोकउपयोगी कामे केली. आज सुद्धा त्यांनी निर्मान केलेले रस्ते, घाट, धर्मशाळा, धार्मिक स्थळे आपल्या राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतभर निर्माण करणाऱ्या प्रथम राज्यकर्त्या आहेत. त्यांनी कुठला भेदभाव न ठेवता प्रत्येक घटकाचा विचार केला. अगदी प्राणी, किटक ते जलचरण मस्य पर्यंत म्हणजे शेवटच्या जिवाचा विचार लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे हाके यावेळी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘हे’ आहेत जगातील आतापर्यंतचे १० शक्तिशाली भूकंप

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालणा देणारा अर्थसंकल्प : उज्ज्वला हाके

आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना गल्लीगल्लीत फिरायला लावणार

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब सोनवने होते. तर प्रमुख उपस्थिती लेखिका शोभा आत्माराम लोंढे, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण लोंढे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे विभागीय सरचटणीस डॉ. पंकज भिवटे, कृषी अधिकारी गोफणे, जनार्दन वाघमारे, डॉ. नारायण डोलारे, अण्णा राजेंद्र शेंडगे, रामराव चव्हाण, संतोष माने, संजय केंजळे उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन राजाभाऊ धडे यांनी केले व आभार उर्मिला पवार यांनी मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी