27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार म्हणाले, गटाराचे प्रश्व महत्वाचे: देवेंद्र फडणवीस यांची चिंता करु नका

अजित पवार म्हणाले, गटाराचे प्रश्व महत्वाचे: देवेंद्र फडणवीस यांची चिंता करु नका

टिम लय भारी 

आज पुण्यात अजित पवारांचे ३१ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका
स्पष्ट केली आहे. लोकांना एकमेकांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. इथल्या लोकांचं म्हणणंय आमचा पाण्याच,
ड्रेनेजचा, विजेचा, स्मशानभूमीचा प्रश्न सुटावा. पण तो प्रश्न राहातो बाजूला. प्रत्येक वेळी कुणी ना कुणी काहीतरी वक्तव्य करतं. एखाद्या नेत्याला नोटिसा दिल्या जातात. या अशा गोष्टीवर भरपूर चर्चा होती. माझी विनंती आहे की लोकांचा वेळ वाया घालवू नका. आपण हे बंद केलं. आपण विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. त्यामुळं पुण्यातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांमधे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजनांचा धडाका पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेआज पुण्यातील तब्बल 30 विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होणार आहे.तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील साडेअकरा वाजल्यापासून उद्घाटन आणि भूमीपूजनांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी